टर्निंग पॉईंट - डॉ.जयंत महाजन


⚜🎯🔮⚜🎯🔮⚜🎯🔮⚜🎯

⚜ प्रेरणा एक सुवर्णपान -11

टर्निंग पॉईंट - डॉ.जयंत महाजन

नमस्कार..!
               मी डॉक्टर जयंत जगदीश महाजन...!

         माझ्या नावाआधी  'डॉक्टर' हे विशेषण लावण्यासाठी मी तर प्रयत्न केलेच.पण ते प्राप्त करतांना माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले माझे पालक,शिक्षक आणि मित्रांचा मी सदैव ऋणी राहीन.
         लोहटारच्या लहानपणाच्या अनेक आनंददायी अशा आठवणी आजही माझ्या मनात घर करुन आहेत.घरात मी सगळ्यात लहान.त्यामुळे खूप लाडका.खूप खेळकर होतो. आमची ज्वाइंट फॅमिली असल्यामुळे मिळून मिसळून राहण्याची सवय होतीच.आमचे कुटुंब प्रमुख माझे आजोबा श्री. शंकरराव गोटू महाजन यांच्या सानिध्यात माझा बराच काळ गेल्याने.त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव माझ्यावर पडत होता आणि मी घडत होतो.

         लहानपणी श्री.ठाकरे गुरुजींनी माझ्या शिक्षणाचा पाया रोवला.प्राथमिक अवस्थेत चांगल्या गुरूजनांच्या तालीमीत घडलो.वेळेवर अभ्यास करण्याची सवय लागली.पुढे पाचवीत माध्यमिक शाळेत गेल्यावर श्री.एन.एन.पाटील सर ,व्ही.डी.वाणी,व्ही.पी.वाणी सर,पी.के.महाजन सर,सुभाष चौधरी सर,बी.एस.चौधरी या सारख्या आदर्श शिक्षकांची फळीच मला लाभली.ते सगळेच शिस्तप्रिय व विद्यार्थ्यांसाठी सर्वस्व झोकून देणारे असे होते. होमवर्क नाही केला तर शिक्षाही मिळायची.राग यायचा त्याचा तेव्हा, पण त्याचे महत्त्व आज कळतय. परीक्षेचा काळ आजही खूप आठवतोय.स्पर्धा अन् मित्रही किती निथळ पाण्यासारखे होते.घडत गेलो गावकीच्या वातावरणात.माझा मित्र परिवारही फार मोठा. निलेश,सचिन,रवी,दगडू,प्रदीप,
संदीप,दशरथ,विजय,विनोद,बापू,अभि,मनोज लिस्ट न संपणारी....

           खरा टर्निंग पॉइंट माझ्या आयुष्यात माझी सातवी झाल्यानंतर आला.तेव्हा माझी बहीण डॉक्टर पूनमने दहावीत छान यश संपादन केले होते.तिचे अभिनंदन करण्यासाठी आमचे नातेवाईक श्री.मनोहर पाटील सर हे आले होते.तेव्हा त्यांनी माझ्या पप्पांना शिक्षणासाठी जळगावला घर करण्याचा सल्ला दिला. पप्पांनीही त्यांच्या सल्ल्याला सकारात्मक प्रतिसाद दिला व पप्पांच्या निर्णयाला घरातील सर्वांनी पाठींबा दिला.माझे दादा मोहन सर, माझी मोठी आई व आजी बाबा यांनी हा मोठा निर्णय घेतला.गाव,शाळा अन् मित्र सोडतांना खूप जड गेले.अश्रूंना वाटही कोपऱ्यात करून दिली होती.आव्हान पेलण्याची क्षमता रूजवली जात होती.

        १९९२साली मी,माझी बहिण,माझा भाऊ प्रमोद महाजन,रेखाताई आम्ही सर्व जळगावला शिक्षण घेऊ लागलो.या निर्णयाने पप्पांना त्यांचा लोहटारचा दवाखाना,शेती, राजकीय सहभाग यांचा त्याग करावा लागला.१९९२ ते १९९७ हा आमच्या कुटुंबाचा खरा संघर्षाचा काळ होता.माझ्यासाठी मनोहर पाटील सर 'गॉडफादर' व गुरू.त्यांनी माझ्या क्षमतांना उंचाविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.एन.टी.एस परीक्षेत महाराष्ट्रातून २९ वा क्रमांक पटकावण्याचा बहुमान मला त्यांच्यामुळेच मिळाला.१० वी ला पण ८७% मिळण्याचे श्रेय ही त्यांचेच आहे.घडण्याच्या वेळी कुटुंबातील व्यक्तींनी घेतलेला निर्णय योग्य होता.हे सिद्ध करण्यास पुरेसे ठरले. वेळेवर केलेला अभ्यास,चिंतन,जाणीव यावेळी कामी आली.अभ्यास हाच जवळचा मित्र बनला होता मिळालेल्या गुणांमुळे परिवारासह गावालाही आनंद झाला.

       अकरावीत गेल्यावर मात्र मी फार रिलॅक्स झालो.अभ्यासच केला नाही.परिणाम ६०% मार्क्स .त्यातून निराशा वाटेला आली.१२ वी मधील पहिले सहा महिने कमी अभ्यासात गेले.नंतर आजोबा वारले.मी थोडा गंभीर झालो. आई ने धीर देत मला मी करु शकतो याचा आत्म-विशवास दिला.मी ही मनोहर पाटील सर व ताईने सांगितलेले मोलाचे शब्द आठवले.पप्पांची होत असलेली कसरत,संघर्ष,आजी बाबांचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून जोमाने अभ्यास सुरू केला.माझ्या मेहनतीला फळ मिळाले.मला Medical group ला 94% मार्क्स मिळाले आणि आमच्या जळगावला घर करण्याचा निर्णय सार्थकी लागल्यासारखे वाटू लागले. योग्यवेळी जागृत झालो अन् प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाल्यानेच हे शक्य झाले.

        मुंबईला एम.बी.बी.एस महाराष्ट्रातील नामांकित लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन येथे शिकण्याचा मान मिळाला.नंतर *मी अस्थिरोग तज्ज्ञ* झालो.हा सगळा प्रवास खूप खडतर तितकाच आनंददायी व रोमांचक होता.तो जगलो आनंदाने.खूप शिकलो.

        २००७ ला श्रुती माझी लाईफ पार्टनर माझ्या जीवनात आली. २००८ ला जामनेर येथे 'महाजन ॲक्सिडेंट हॉस्पिटल' च्या रूपाने मी वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. आमच्या संसारात श्रुजल आणि हर्षांकच्या आगमनाने आनंद वृद्धिंगत झाला.
               
  नंतरच्या माझ्या या यशात मला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन आणि आधार मिळत गेला तो माझ्या जिजाजींचा.डॉ.हेमंत पाटील बालरोगतज्ञ जळगाव यांचा.माझे दादा मोहन सर,मोठी आई,माझा भाऊ प्रमोद,ताई या सगळ्यांचीच नेहमी माझ्या प्रत्येक निर्णयाला साथ दिली.
        शेवटी सगळ्यात महत्त्वाचे माझे आई आणि वडील आजही त्यांनी त्यांचे स्वप्न,आशा आकांक्षा,मित्र परिवार यांचा त्याग करून पूर्णवेळ जामनेरला आमच्यासोबत व्यतीत करत आहेत. आपल्या मुलांना मोठय़ांची छत्रछाया लाभणे फार महत्त्वाचे आहे.

    मित्रहो,लहानपणापासूनच नियोजनाला महत्त्व देत गेलो होतो.गुणांच्या स्पर्धेत कधी फिरकलोच नाही.सारं काही करतांना योग्य नियोजन आखून स्वतःशी स्पर्धा करत होतो.घडत होतो.धडपडत होतो.मिळालेल्या संधीचे सोने करत गेलो.थोरांचा सहवास आणि प्रेरणा सोबत होतीच.गुरूजनांचा योग्य मोलाचा संदेश जीवनाला कलाटणी देवून गेला.ध्येय निश्चित असतांना भरकटलो नाही पण जीवनाच्या महत्वाच्या क्षणी आई,गुरू अन् बहीणीचा मोलाचा संदेश आत्मविश्वास जागृत करून गेला.आपलं आधारवड हरपलं की वेदना होतातचं पण त्यातून सावरण्याचं बळ आपल्या जवळच्या व्यक्तींनी केलं  की ते बहुमोलच असतं.संकटांचा सामना करायला शिका.लहान लहान गोष्टीच आपल्याला मोठ्या बनवत असतात.आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा.योग्य नियोजन करून ते निश्चितच आपण ते गाठाल.

           शेवटी ईश्वर चरणी एकच प्रार्थना आहे,कि देव आम्हास ही कर्तव्यपूर्ती करण्याचे बळ देवो !!
धन्यवाद.

👉🏻डॉ.जयंत जगदीश महाजन
अस्थिरोग तज्ज्ञ 
महाजन ॲक्सिडेंट हॉस्पिटल,जामनेर

⚜🎯🔮⚜🎯🔮⚜🎯🔮⚜🎯

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

💎 *प्रेरणा एक सुवर्णपान ब्लॉग* 💎
https://prerana1suvarnpan.blogspot.in/p/blog-page_2.html?m=0

♻ *प्रेरणा एक सुवर्णपान फेसबुक पेज*
https://m.facebook.com/preranaeksuvarnpan/

♻ *Email प्रेरणा एक सुवर्णपान*
preranaeksuvarnpan@gmail.com

♻ *whatsapp प्रेरणा एक सुवर्णपान*
भरत पाटील- 9665911657

🔮🎇🔮🎇🔮🎇🔮🎇🎇🔮🎇

*प्रेरणा एक सुवर्णपान Broadcast ला ॲड व्हायचे असल्यास 9665911657  नंबरवर whatsapp करा.दर पंधरवाड्यात दीपस्तंभ आपल्या भेटीला...स्वअनुभव रेखाटत*

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

No comments:

Post a Comment