“Believe in Consistent Efforts”- Kishor Mahajan


♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

⚜                              प्रेरणा एक सुवर्णपान-3⚜

                “Believe in Consistent Efforts”- Kishor Mahajan
  
                                   दि.1 अॉगस्ट 2017

      आमच्यावेळेस पहिले ते चौथीपर्यंत निकालाच्या दिवशी फक्त पास/नापास सांगितले जायचे,पण माझ्या व बहिणीच्या हातात त्या दिवशी दोन कोरे पेपर दिले जायचे. त्यावर विषयाप्रमाणे मार्क्स लिहून आणायला.गोष्ट छोटी आहे, पण त्यावरुन आम्ही घरी मागच्या वर्षाचे मार्क्स आणि आताचे यात तुलना करायचो.
आताच्या मॅनेजमेंट थिअरीत याला Self Assessment, Graph Analysis असे म्हणतात. याचा जीवनात खूप उपयोग झाला.आपल्याला आपलेच अनुभव अप्रत्यक्षरित्या शिकवत असतात.आमचे माध्यमिक शाळेचे शिक्षक सोनी सर आम्हाला गणित शिकवायचे आणि मला नेहमी म्हणायचे, “तुला सर्व येतं,पण तुला घाई फार असते.” आजही जेव्हा काही निर्णय घ्यायचा असतो तेव्हा मला ते आठवतं.खूप सारं करतांना सरांचा सहज भेटणारा हा गुरूमंत्र आजही उपयोगी ठरतोय.थोडं थांबा घेऊनच निर्णय घेण्याची सवय अंगी बाणवू शकलो.

      “सातवी ब” मध्ये मला व दुसऱ्या एका मित्राला सारखे मार्क्स होते म्हणजे पॉईंट सुध्दा सारखेच होते,पण मार्कशीटमध्ये मला दुसरा नंबर दिला गेला.मी वर्गशिक्षकांना विचारायला गेलो. त्यांनी मला कारण असे सांगितले,की तुमच्या दोघांच्या आद्य अक्षरावरुन ठरवले. पण आमचे दोघांचे आद्य अक्षर एकच होते. मग... ते एकच असल्यामुळे वडिलांच्या नावावरुन ठरवले.कोडं न सुटणारेच ठरले. त्या क्रमांकावरुन माझ्या किंवा मित्राच्या आयुष्यात काहीही फरक पडला नाही.यावरुन एक सांगतो, का? कसे? असे प्रश्न पडले पाहिजेत,तरच उत्तर शोधतांना मार्ग सापडेल.
आहे ते, मिळालेलं, स्विकारावं का त्यातून बाहेर निघावं हा सर्वस्वी आपला निर्णय आहे.

    गावात त्या वेळेस वेगवेगळया गल्लीचे वेगवेगळया क्रिकेटच्या टिम होत्या. त्यांच्या आपसात व इतर आजूबाजूच्या गावांशी मॅचेस व्हायच्या. ते आमचे त्या वेळचे गोल्डन क्षण होते.आजही आठवले की छान वाटतं.खेळ हा माझ्या जीवनात खूप अमुलाग्र घडवून आणत होता.मनसोक्त खेळल्यावर खूप छान अभ्यास व्हायचा.मन आनंदी ठेवण्याचं रसायनचं होतं ते..खेळाचा काय फायदा झाला? असा विचार केला तर इंडस्ट्रिमध्ये Peoples Management, Group Activity, Planning and Execution हे महत्वाचे असते. आपण ग्रामीण भागातल्या मुलांचा एक स्ट्राँग पॉईंट असा आहे की, आपण सुरुवातीला कुठल्याही खालच्या परिस्थितीशी जुळवून घेतो आणि वर्कर ते टॉप मॅनेजमेंट या सगळयांबरोबर काम करु शकतो.खेळामुळेच सहकार्यवृत्ती,संघभावना,निर्णयक्षमता,एकाग्रता,आत्मविश्वास इ.विविध गुणांचा विकास साधता आला. प्रत्यक्षात फिल्डवरही उपयोग करता आला आणि करतोय..

*“Every phase of our life is bound to teach us something valuable.But it depends on us whether we analyse the lesson or just turn the pages.”*

आमच्या वर्गात 7-8 मुला-मुलींचा ग्रुप होता,की त्यांनी त्योवेळेस वेगवेगळे  निर्णय घेतले. जसे 7 वीत स्कॉलरशिपची परिक्षा देणे, त्यासाठी चौथीत आम्हाला मदत करणाऱ्या रमेश गुरुजींची परत मदत घेणे, नवोदय विद्यालयासाठी परिक्षा देणे (जी पहिल्यांदा आमच्या बॅचने दिली असणार), इंग्रजी ग्रामरसाठी संभाजी सरांकडे ट्युशन लावणे, शाळेत शिक्षक नसताना दहावीला बोर्डाला संस्कृत विषय घेणे, त्यासाठी चंदिले महाराज (किर्तनकार) जे नगरदेवळयाचे शिक्षक यांना दर शनिवारी/रविवारी बोलावणे, इत्यादी.

*“What is output of life?*
*Output of life is the result of the cumulative decision taken by us against the opportunities.”*

1994 ला डिप्लोमा केमिकल इंजिनिअरींगला ॲडमिशन घेतली (दुसऱ्या एकाला आदर्श मानून). संपूर्ण महाराष्ट्रातल्या केमिकलच्या मुलांना LIT Engineering Nagpur या Government Engineering College ला ॲडमिशन घेण्याचं स्वप्न रहायचं. डिप्लोमा ते डिग्रीला फक्त 3 शीट्सचा कोठा होता (त्यावेळेस).शेवटच्या वर्षाचा निकाल लागला. मला LIT Nagpur कॉलेजात आरामात ॲडमिशन मिळेल इतका माझा स्कोर होता,पण मी ॲडमिशन न घेता जॉब शोधायचं ठरविलं. खरंतर माझ्यातल्या व्यावहारीक दृष्टीकोनातून तो निर्णय घेतला होता.

       बोईसरला डोअर टू डोअर ॲप्लिकेशन दिल्या. त्यात निर्भय रसायन कंपनीतून कॉल आला व मी ती जॉईन केली.
त्यानंतर 3-4 वर्षात 2-3 कंपन्या बदल केल्या अर्थात करिअर ग्राफ वाढवत. वर्ष 2001 ला घरडा केमिकल चिपळूण जॉईन केली. ती माझी पहिली कंपनी की जीने मला थोडी स्थिरता दिली. कॉलनी/मॅरेज लाईफ अशी सुरुवात होत असताना मला Bharat Petroleum Corp. Ltd  चा कॉल आला.

सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब बिना वशिल्याने व पैशांशिवाय मिळत नाही हा समज मनात होता.लेखी परिक्षा, दोन इंटरव्ह्यु, ग्रुप डिस्कशन यांतून जवळजवळ 500-600 जणांमधून आम्ही 28 जण सिलेक्ट झालो. मला वाटतं, त्यासाठी आपल्या भूतकाळातील तयारीच कामी येते.

*“Today’s Preparation Determines Tomorrows Achievement.”*

आणि 11 एप्रिल 2005 ला बी.पी.सी.एल. मुंबई रिफायनरी जॉईन केली.

आपल्या आयुष्याला जर क्रिकेट मॅचबरोबर तुलना केली तर पहिले 15 ओव्हरमध्ें जास्त रनरेट ठेवायचा असतो, त्याबरोबर मोठा स्कोअरचं टारगेट असतं. पण पिच/बॉल नवीन असतो, तो जास्त स्विंग होतो. जसे जसे आपण स्थिरावत जातो, तसा आपला आत्मविश्वास वाढत जातो. मग आपण लाँग इनिंगचा विचार करायला लागतो.  तसे मला मधल्या स्थिरावलेल्या इनिंगसारखे मुंबईत बी.पी.सी.एल. मध्ये 8-9 वर्ष झाले होते.  मिळालेल्या वेळेत केमिकल इंजिनिअरींगमध्ये अपग्रेड करायचं ठरवलं, पुन्हा विद्यार्थी सारखं अभ्यास करायला लागलो. मग कंपनीत इंटर्नल प्रोमोशनसाठी ॲड आली, परत सर्व प्रकारच्या प्रयत्नांमधून पहिल्या फेरीत यशस्वी झालो. आता मी 3 वर्षांपासून बी.पी.सी.एल. मध्येच अशा जबाबदारीत आहे जेथे कंपनी कॅम्पस इंटरव्ह्यू मधून फक्त IIT, LIT Engineers घेते.  शेवटी 15 वर्षांनी सर्कल पूर्ण झाले. जे LIT Engineering Nagpur मी सोडलं होते,त्याची थोडीतरी हानी भरुन निघाल्यासारखं वाटलं.

असे अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात.  आपण जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा कळतं की, आपल्यापेक्षा कीतीतरी जण यशस्वी आहेत, आपल्यापेक्षा जास्त स्ट्रगल करणारे आहेत. प्रत्येक संधीला एक मणी समजलात तर सर्व मण्यांना एका धाग्याने एकत्र टाकलं तर निश्चितच त्याची माळ तयार होते. माळ बनवायची का फक्त मणी जमवायचे हे आपल्या हातात असते.
     जीवनात आलेला प्रत्येक क्षण आपणांस खूप शिकवून जातो.जीवनात आलेले यश अपयश हेच जीवनाचं सारं महत्त्व समजावून देतात.चारचौघांसारखंच स्वप्नं घेऊन उतरलो होतो आणि सत्यातही उतरविले.शेवटी एकच सांगेन,प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीला यश निश्चितच मिळते.
धन्यवाद ..

Thanks to everyone for reading

Kishor Vasant Mahajan
Executive Officer BPCL
Mobile No.: 9644376777

******************************************
काही प्रेरक अभिप्राय..
🔮Kishor - nicely articulated. Life journey expressed in simple and sweet summary. Superb. Few things were unknown till the moment and came to know today. That's the another benefit of initiative taken by Bharat. Knowing Love Thar star's life journey in depth. 
- NIMBA PATIL,AHMADABAD,GUJRAT
*******************************
  I like ur words "Believe in Consistent Efforts" wish u all th best. आत्मविश्वास अशक्य ते शक्य करुन दाखवितो...
- JITENDRA PATIL
NASHIK

****************************
 The struggling person always build a milestone.
Kishor sir you are real ideal motivationl idol for those who really struggled a lot.Your entire life span is heart touching

Gajanan Udar Nashik
****************************

 *Really everyone in society specially students will get much more inspiration from above story of Mr.Kishor Mahajn.* So first of all I would like to thank Bharat Sir you and all your team.you people putting such success stories infront of society through social media.Now a days everyone is in touch of social media..This is the nice way to give inspiration to youngsters. Once again hearty thanks to all of you.. Keep working ahead.. Special Wishes for Kishor Mahajan... hats off.🎓🎓
Mr.Devade Lasalgaon,Nashik♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻
------------------------------------------------------------------------------------------------------------------
💎 *प्रेरणा एक सुवर्णपान ब्लॉग* 💎

⚜ *जिद्द एक प्रेरणा - निंबा पाटील*
 http://prerana1suvarnpan.blogspot.in/?m=1

⚜ *मेहनतीचा दीपस्तंभ- दत्तात्रय पाटील*
https://prerana1suvarnpan.blogspot.in/p/2.html?m=0

♻ *प्रेरणा एक सुवर्णपान फेसबुक पेज*
https://m.facebook.com/preranaeksuvarnpan/

♻ *Email प्रेरणा एक सुवर्णपान*
preranaeksuvarnpan@gmail.com

♻ *whatsapp प्रेरणा एक सुवर्णपान*
भरत पाटील- 9665911657

🔮🎇🔮🎇🔮🎇🔮🎇🎇🔮🎇

*प्रेरणा एक सुवर्णपान Broadcast ला ॲड व्हायचे असल्यास वरील नंबरवर whatsapp करा.दर पंधरवाड्यात दीपस्तंभ आपल्या भेटीला...स्वअनुभव रेखाटत*

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

No comments:

Post a Comment