उत्तुंग ध्येयाशक्ती - विजय पाटील



🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣

प्रेरणा एक सुवर्णपान - 14

उत्तुंग ध्येयाशक्ती -विजय पाटील

    मी,विजय भागवत पाटील राहणार लोहटार.शिक्षण बी.ई. केमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात व्यवसाय करीत आहे.
खरं तर प्रेरणा एक सुवर्णपान हे लिहिण्यात अत्यंत आनंद होत असून,आपण आपले मन हलके केल्यासारखे वाटते.आपले मत व भविष्यात समाजाप्रती करू इच्छिणारे योगदान समाजापर्यंत पोहोचविण्याचे हे सुंदर सदर प्रयत्न करते.तरूणांना दिशा तर मिळतेच पण स्वतःकडे पाहण्याचा निर्मळ आरसाही तयार होतोय.

      खरं तर माझे वडील श्री.भागवत भगवान पाटील हे माझे ग्रेट आयडियल फादर.
माझी इयत्ता पहिली व दुसरी लोहटार झेडपीच्या शाळेत झाली. कोपरी शाळेचा वर्ग हा माझा आवडता वर्ग होता.आमचे वर्गशिक्षक विजयसिंह गुरुजी नाचणखेड्याचे.इयता दुसरीत असताना मी शाळेत जात नाही म्हटल्याने अण्णांनी बोखरी काढली. मी पुढे व अण्णा मागे.आजही बोखरी अन् आण्णा असं समीकरण हृदयात बसलेलं.त्या दिवसापासून शिक्षणाचे महत्त्व कळाले,कारण आण्णा ५वीला असताना आजोबा वारले आणि आण्णा एकटे व चार बहिणी,आजी,आई असे त्यांचे कुटुंब.आजोबा असताना फक्त दोन बीगे शेती उरली होती.परिस्थितीने शाळा सोडायला भाग पडले.दोन वर्षे रोजंदारी आणि १४ वर्षे सालदारीचा प्रवास करावा लागला.वर्गात सगळयात हुशार असल्याने  त्यांना इयत्ता ७वीत शाळेत दाखला मिळाला.त्यांचे वर्गमित्र डॉ.जगदिश महाजन,जनार्दन येवले,भारत सोमपुरकर व पी.के.महाजन सर.वर्गमित्र छान लाभल्याने त्यांच्या विचारांची श्रीमंती कळते.मित्रांचे महत्त्व ते सहज सांगून जातात. वडीलांचे थोडक्यात चांगले विचार सांगावयाचे झाल्यास- प्रामाणिकपणा,Always positive thoughts,सतत चांगले विचार करणे,सगळयांना चांगला सल्ला देणे,Very Hardworking, नेहमीच कर्जबाजारी असणे, स्वत:च्या मतांवर ठाम विश्वास ठेऊन ठरवलेल्या गोष्टी पुर्ण करणे.सतत Asset वाढविणे व दुरदृष्टी ठेवणे.त्यांच्या या गुणांमुळेच एक आदर्श आयडीयल मला त्यांच्या रूपातच मिळाले.

      मी दुसरीत असताना वडीलांनी सालदारकी सोडून दुध व्यवसाय व कसवर शेती करण्याचे ठरवले. मला इयत्ता तिसरीत जात असताना वडीलांनी झेडपी शाळेतन काढून बेलगंगा पब्लीक स्कुल होस्टेलला इयत्ता पहिलीला टाकले. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे अन् त्यास आपल्यासारखे दिवस यायला नकोत,मेहनत कितीही करावी लागली तरी चालेल पण कमी पडायचे नाही हे त्यांनी पक्के ठरविले होते. प्रत्येक आईवडील असाच विचार करतात.पहिलीला असतांना आण्णांची बोखरी आठवली आणि पहिला क्रमांक पटकावला. शामदादा सोमपुरकर व घरचे रिझल्ट बघून खुश झाले. शाबासकीची थाप योग्य वयात मिळाली की आपुसकच दिशा योग्य मिळते असे वाटते.सतत हा Performance चालू होता.
खरंतर शाळा ही सगळयांची चांगली असते व आपले शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेत असतातच.योग्य शाळा अन् योग्य मार्गदर्शन मिळाले तर ध्येय गाठणे हे सोपे होतेच पण आपण स्वतःही तितकेच योगदान देणे गरजेचे असते. गणित,सायन्स व टेक्नीकल विषय हे माझे सर्वात आवडते विषय होते आणि आहेत.
आमच्या शाळेत इयत्ता १लीपासून टेक्नीकल विषय होता. त्यामुळे शाळेतील 70-80 टक्के विद्यार्थी इंजिनिअरींगला गेले व चांगल्या कंपनीत कार्यरत आहेत. खरंतर मला शाळेत खोडकर व ब्लॅकलिस्टेड विद्यार्थी म्हणून ओळखत असत. शिवाय All rounder in sports, study and cultural activities अशी वेगळीही ओळख होतीच.मी उन्हाळयाच्या सुट्टीमध्ये घरी आलो की वडील (आण्णा) मला जळगांवला पुढील वर्षाच्या टयुशन्स लावून देत व नातलगांकडे ठेवत असत.

माझी पहिलीची फी 5000 ते 10 पर्यंत.1996 ला 14000/- पर्यंत होती. ही फी भरण्यासाठी सर्व रक्कम आण्णा जवळजवळ 3-4 टक्के व्याजाने पैसे काढत असत. वडीलांची चिकाटी होती. माझ्या मुलाने इंजिनिअर होऊन चांगला व्यवसाय करावा. ते नेहमी मला सतत सांगत...'शेती म्हणजे ढोर हमाली व पैसे देऊन माणसाची तोलम पट्टी करणे'.

खरंतर मित्रांनो,आम्हाला इयत्ता 7 वी व 8 वीला पुरेपूर शिक्षक नसल्यामुळे आमचे अभ्यासावर दुर्लक्ष झाले. कारण शाळा प्रायव्हेट असल्यामुळे शिक्षकांना पगार वेळेत मिळत नसल्यामुळे सगळे चांगले शिक्षक शाळा सोडून गेले.
माझ्या सोबत विजय आबा वाणींचा मुलगा निलेश व भारत सोमपुरकर यांचा पुतन्या राहूल हे दोघे.इ. ७वीत दोघं शाळेतून नाव काढून पुणे व मुंबईला गेले.आण्णांनी मला तेथेच continue केले.आता मात्र ९वी व १० वी ला मागील २ वर्षांचा बॅकलॉग भरणे गरजेचे होते.
इयत्ता १० वीला पॅटर्न बदलल्यामुळे बऱ्यापैकी कंफ्युजन होत होते. १० वीला कमी मार्कस मिळाल्याने आण्णा मात्र नाराज झाले.डिप्लोमा ॲडमिशन घेण्यासाठी अमरावतीला गेलो.परंतु सिव्हील मिळत असल्याने व पैशांची अडचण आल्यावर कोण मदत करणार म्हणून परत अमळनेर प्रताप कॉलेजला 11वी सायन्सला ॲडमिशन घेतले. खरंतर आण्णा दर वर्षी 1986 पासून ते आतापर्यंत शेती व प्लॉट घेत गेले.तेही सगळे व्याजाच्या पैशांनी.व्याजाने पैसे देणारी मित्रमंडळी,हे सगळे म्हणत,"आण्णा,तू पक्का आहेस व्याजाने पैसे वापरणारा."

     1ली ते 10वी होस्टेलला राहिल्याने कधीच घरची आठवण येत नसे.फक्त पैशांची अडचण येत होती,तेव्हा ॲडजस्टमेंट करायला शिकलो.घरच्यांना कधीही पैसे नाहीत म्हणून त्रास दिला नाही.12 वीत भरपूर अभ्यास केला परंतु फारसे यश मिळाले नाही. परंतु ठरवले होते इंजिनिअरींग करायचे म्हणून.. डिप्लोमा ला परत ॲडमिशन घेतले ते प्रायव्हेट Bambhori College, जळगांवला Chemical Engineering ला. आता घरच्यांना १० व १२ वीत नाराज केल्यामुळे मला स्वत:ला माझी लाज वाटत होती. मात्र त्यावेळी (2000-2005) आमचा दुध व्यवसाय चांगलाच जोमाने चालत होता.त्यामुळे शनिवारी संध्याकाळी व रविवारी घरी जात होतो व घरच्यांना कामात मदत करत होतो.आता व्यवसाय करुन पैसे कसे मिळवायचे हे लक्षात येत होते. योग्य वयात व्यवहाराचे ज्ञान मिळत होते. सुट्टयांमध्ये आण्णा मला गायी म्हशी चारायला लावत व कधी-कधी शेतात कोळपणे,गाय म्हशीचे दुध काढणे,आता मला हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क मधील फरक कळायला लागले होते.

 मी आता डोक्याच्या कामाला लागलो आणि चांगलाच अभ्यासाच्या मागे लागलो. डिप्लोमाला First Class आणि Last Year Distinction  मिळविले. डिप्लोमा नंतर डिग्री ला त्याच कॉलेजला ॲडमिशन घेऊन परत Distinction मिळविले.जीवनात खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण असते.खेळाचे लहानपणापासून आकर्षण होते अन् तेच मला अभ्यासात उपयुक्त ठरत होते.युनिव्हर्सिटीत फुटबॉल खेळाडू म्हणून खेळलो.व्हॉलीबॉल आणि रनिंग (ॲथेलेटिक्स) मध्ये passion म्हणून जगल्यानेच स्टेट विनर खेळाडू म्हणून ओळखण्यात यशस्वी ठरलो.तेथील निर्माण झालेला आत्मविश्वास मला आजही उपयोगी ठरत आहे.मी मनात ठरवून घेतले होते की, किमान 5-6 वर्ष जॉब करायचा आणि स्वतःचा व्यवसाय चालू करायचा.कारण अण्णा नेहमी माझ्याशी व्यवसायाबद्दल बोलत असत. माणसाने नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसायाकडे सुध्दा लक्ष देणे म्हणजे दुय्यम व्यवसाय करणे. किमान ४ वर्ष नोकरी करत करत सगळया क्षेत्राचा अभ्यास करत होतो.उदा. Chemical manufacturing, petro chemical, pestiside, fertilizer आणि शेवटी pharma chemical company चा अनुभव घेत असतांना Water treatment चा व्यवसाय करण्याचे ठरविले. Torna Engineering ही air pollution project वर मिळाली, तेव्हा कळले की Thought become things.
  इयत्ता १२ वी नंतर ठरविले होते की,इंजिनियरींग क्षेत्रात करियर करायचं. तेव्हापासून इंजिनियरिंगला असतांना General Knowledge बरोबरच Practical Knowledge वर सुध्दा लक्ष केंद्रित केले.सारं मनासारखं घडत होतं.ध्येयावर लक्ष केंद्रित करत होतो.

 2006 मध्ये अश्विनीशी लग्न झाले.अश्विनी मुळात हुशार व स्कॉलर आहे. तिने घर सांभाळून ठाणे येथून बी.ई पूर्ण केले. तिच्या हिमतीमुळे व सपोर्ट मुळे मला व्यवसाय करणे शक्य झाले.

 व्यवसाय करत असतांना मराठी माणूस व्यवसाय करतोय, याचे आश्चर्य वाटायचे. परंतु मी त्याचा जास्त विचार न करता सतत सपने बडे देखो, सच जरुर होते है |याप्रमाणे वागत राहिलो. त्यामुळे मला हळूहळू व्यवसायात यश मिळत गेले. मी छोटया छोटया Asset जमा करत गेलो. Asset म्हणजे ऑफिस,प्लॉट किंवा सोने घेणे इ.. अश्या छोटया छोटया assets मुळे मला फॅक्टरी घेणे शक्य झाले.मात्र व्यवसाय करत असतांना नेहमी.. I always believe in myself.यावर विश्वास ठेवतोय.सध्या माझ्या कंपनीचे पुढील क्षेत्रात काम सुरू आहे. company deals in industrial pollution control projects. Clients are BARC (BABA ATOMIC ENERGY RESEARCH center ),  INDIAN RAILWAY,  MNC COMPANIES P&G, HUL, BASF, JAIN FOOD, GENERAL MILLS, Nestle, UKL AND OTHERS PVT LTD COMPANY.

 मित्रहो,पैसे कमविणे सोपे आहे,परंतु ते कमवणे,टिकवणे व त्याचा योग्य वापर करणे हे अवघड आहे.याकरिता Always increase your asset.. कारण बँकेत पैसे ठेऊन माणूस आळशी बनतो असे म्हणतात. याउलट Asset  म्हणजे जवळील पैसे संपविणे आणि ते परत मिळविण्यासाठी कष्ट/काम करणे होय.ज्यामुळे माणूस मोठाही होतो आणि आळशीही बनत नाही. कुटुंबातील वडीलांसोबत आई,भाऊ अन् बहीण यांचे योगदानही माझ्या आयुष्यात सदैव प्रेरणा देणारे ठरले आहे.त्यांच्या सर्वांच्या बहुमोल अशा मार्गदर्शनामुळे,योग्य दिशेने प्रवास सुरू आहे.प्रत्येकाला यशस्वी होण्यासाठी कौटुंबिक आधार हा गरजेचा असतो अन् तो मला मिळाला आणि आजही मिळत आहे.

   शेवटी माझे व्यवसाय करण्याचे कारण सामाजिक क्षेत्रात चांगली समाज सेवा करणे,शिक्षण क्षेत्रात प्रवेश करणे.मी आपल्या गावात आय.टी.आय व इंग्लिश मिडीयम शाळा सुरु करणार. या क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना मोफत व कमीत कमी शुल्कात शिक्षण देणे,समाजासाठी चांगले विद्यार्थी तयार करणे हे माझे स्वप्नं आहे.
धन्यवाद..!

📝 विजय भागवत पाटील
VB ENGINEERS COMPANY,NASHIK
Mob - 7720013524

🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣

♻ *प्रेरणा एक सुवर्णपान फेसबुक पेज*
https://m.facebook.com/preranaeksuvarnpan/

⚜🎯⚜🎯⚜🎯⚜🎯⚜🎯⚜

♻ *Email प्रेरणा एक सुवर्णपान*
preranaeksuvarnpan@gmail.com

♻ *whatsapp प्रेरणा एक सुवर्णपान*
भरत पाटील- 9665911657

🔮🎇🔮🎇🔮🎇🔮🎇🎇🔮🎇

*प्रेरणा एक सुवर्णपान Broadcast ला ॲड व्हायचे असल्यास 9665911657  नंबरवर whatsapp करा.दर पंधरवाड्यात दीपस्तंभ आपल्या भेटीला...स्वअनुभव रेखाटत*

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

No comments:

Post a Comment