मेहनतीचा दीपस्तंभ- दत्तात्रय पाटील

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

💎 प्रेरणा एक सुवर्णपान 2 💎

          दि.16 जुलै 2017

     मेहनतीचा दीपस्तंभ - दत्तात्रय पाटील

  मित्रहो,
सप्रेम नमस्कार…..
मी दत्तात्रय परमेश्वर पाटील, रा.लोहटार, ता. पाचोरा, जि.जळगाव सध्या नवी मुंबई पोलीस दलात सन 2012 पासून पोलीस शिपाई या पदावर नोकरी करीत आहे. सध्या माझी नेमणूक खांदेश्व्रर पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे असून मी या ठिकाणी दप्तरी म्हणून नोकरी करीत आहे.
मित्रहो, मी लोहटार येथील एका गरिब घरातील मुलगा… माझ्या आई-वडीलांकडून लहानपणापासूनच मी कष्टाचे धडे घेतले आहेत… मला नेहमी काम करण्यास आवडते…
माझे प्राथमिक शिक्षण हे आपल्या गावातीलच मराठी शाळेत तर माध्यमिक शिक्षण हे पंडीत जवाहरलाल नेहरु माध्यमिक विद्यालयात झाले आहे. शाळा शिकतांना घराची परिस्थिती जेमतेम त्यामुळे मला सुट्टी असली की, मी रोजंदारीने मिळेल त्या कामास जात होतो. अशा पध्दतीने मी शिक्षण पूर्ण केले. मी ५ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करित असतांना मला वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच वर्गात ०१ ते ०३ येत असल्याने त्याचे बक्षीस हे हमखास स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी मिळत असे. मी शिक्षण घेत असतांना माझ्या आई-वडीलांचा यात सिंहाचा वाटा आहे.लहानपण असेच काम करण्यात आणि चारचौघांसारखेच गेले.
     मी १० वी नंतरचे शिक्षण घेण्यासाठी पाचोरा येथील एम.एम. कॉलेज येथे ११ वी कला या वर्गात प्रवेश घेतला. सदरवेळी मी शेतात काम करीत असलेल्या बुटावरच कॉलेजला जात होतो. तसेच कॉलेज करतांना देखील मी मिळेल ते काम करित असे. मला एवढेच सांगावेसे वाटते की, जर मला १० वी नंतर कोणाचे तरी योग्य्‍ मार्गदर्शन लाभले असते तर मी वेगळया क्षेत्रात काम करित असतो.जीवनात प्रत्येक क्षण महत्त्वाचाच..
    माझे शिक्षण हे एस.वाय.बी.ए पर्यंत झाले अन मी सन २००१ मध्ये नवी मुंबई येथे कामाच्या शोधात आलो. त्यावेळी मी रबाळे एम.आय.डी.सी येथे एका कोटेड कंपनीत कामास होतो. सदर ठिकाणी मी जवळ जवळ ३ ते ४ महिने काम केले. परंतु सदर ठिकाणी मिळणारा पगार हा कमी असल्याने मी गावी लोहटारला आलो. लोहटारला आलेवेळी मी कामाचे शोधात असतांना मला श्री.डी.एल.पाटील सर व त्यांचे बंधु  प्रभु पाटील यांनी त्यांचे मित्र असलेले स्वप्नेश बाहेती यांचेकडे असलेल्या जे.सी.बी मशिनचे देखरेखीची जबाबदारी दिली. सदर कामासाठी मला चोपडा येथे मुक्कामास रहावे लागत असे. त्यावेळी मी सदरची नोकरी व्यवस्थितपणे केली. जोपर्यंत काम होते तोपर्यंत बाहेती यांनी कामावर ठेवले.त्यानंतर मला कामावरुन काढुन टाकले.ही जीवनाला मिळालेली दिशाच होती.
    मित्रहो, मी काम नसल्याने थांबलो नाही. गावात येत नसलेल्या वर्तमानपत्रांची एजेन्सी सुरु केली. प्रथम मला सकाळ पेपरची एजेन्सी मिळाली. एजेन्सी सुरु झाल्यानंतर मला सायकलने पेपर घेणेसाठी काही दिवस सकाळी ४:०० वा. भडगाव येथे जावे लागत होते. म्हणून मी रात्री श्री. लालचंद रामभाऊ परदेशी यांचे शेतात झोपत होतो. मी घाबरत असल्यामुळे सकाळी पेपर घेणेसाठी कै. विजय लालचंद परदेशी हा माझे सोबत भडगाव येथे येत होता. कै. विजय याने खुप मदत केली. त्यानंतर मी दैनिक देशदूत चे कार्यालयात जावून पेपर सकाळी लवकर टाकणार या अटीवर दैनिक देशदूतची एजेन्सी आपलेकडे घेतली. या कामासाठी मला श्री. सुभाष पाटील व श्री. सचिनदादा सोमवंशी यांची मदत झाली. तसेच मला दैनिक देशदूतमध्ये व्यवस्थापक म्हणून काम पाहणारी श्री. सुभाष गोळेसर व श्री. अजय पाटील सर यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले. माझा पेपर लवकर येवून देखील लोकांनी हवा तेवढा प्रतिसाद दिला नाही.तरी मी न डगमगता वाटचाल सुरूच ठेवली.पेपरचा खप कमी होत असल्याने मी भर पावसात बांबरुड, पिंपळगाव, बांबरुड महादेवाचे, लोहटार तसेच गाळण बु || गाळण खु ||, तसेच दोन्ही गाळण तांडा या ठिकाणी सायकलवर जावून पेपर वाटत होतो. पावसाळयात लेाहटार-गाळण रस्त्यावर मध्ये2/3 कि.मी अंतरावर चिखल असल्याने सदरचा चिखल सायकलचे मटगार्डमध्ये अडकून सायकल जाम होत होती. म्हणून मी सायकल ही मधल्या दोन ते तीन किलोमीटर खांदयावर उचलून नेत होतो. सदरवेळी माझ जीव रडकुंडीस येत होतं. पण मित्रहो मी कधीही  हार मानली नाही. कारण मला अजून पुढे काही तरी करुन दाखवायचे होते.त्यावेळी मला खूप त्रास हेात असतांना देखील मी त्याकडे लक्ष न देता ४ ही गाळण येथे पेपर वाटणे चालूच ठेवले.योग्य संधीची वाट पाहत होतो.
पेपर वाटल्यानंतर मी कामाला जात होतो. परंतु पेपरला जर जोडधंदा सुरु केला तर लोकांशी संपर्क वाढेल म्हणून मी चावडीजवळील जागा रिकामी असल्याने योगेश मार्टचे जागेवर गोणपाट आडवे लावून हिवाळयात अंडा-पाव चे दुकान चालू केले. सदरचे दुकान हे मी फक्त सायंकाळी लावत होतो. हिवाळा संपल्यानंतऱ आता काय उद्योग करावा म्हणून चिंतेत असतांना मी गावात कोणता धंदा नाही असा धंदा सुरु करायचे म्हणून मी गोटी सोडाचे दुकान चालू करायचे असे ठरविले. परंतु मला पैशांची अडचण असल्यामुळे सदरवेळी बाबुराव देवराम चौधरी (सी.आर.पी.एफ) यांनी ५००० रु.ची आर्थिक मदत केली.त्या मदतीवर मी माझे स्वतःचे गोटी सोडा मशिन आूणन व्यवसाय चालु केला. त्यावेळी मी बांबरुड येथे पेपर घेणेसाठी गेलो की तिकडून सायकलीवर बर्फ घेवून यायचो. तसेच निंबूची गोणी घेवून यायचो. गोटी सोडासाठी मला बर्फ व निंबू लागत असल्याने त्या गोष्टी मला आवश्यक होत्या. निंबू मला दुकानावर देखील लागत होते. त्यामुळे मी पेपर वाटून झालेनंतर गावात निंबू देखील विकत होतो. तसेच दुकानावर कोल्ड्रींक्स देखील ठेवीत होतो. मी सकाळी ४:३० वा. उठून मी पेपर वाटून रात्री ११:०० ते ११:३० वा चे सुमारापर्यंत पानटपरीवर असायचो.
उन्हाळा संपल्यानंतर पावसाळयात कोणता व्यवसाय करायचा या चिंतेत असतांना आता आपण पानटपरी चालवायची असे ठरविले. त्यामुळे माझेकडे व्यवसाय करुन आलेले पैसे तसेच माझे आई-वडीलांकडून आलेले पैसे याच्यातून पाचोरा येथून भंगारमधील गॅलोनाईजचा पत्रा आणून श्री. पंडीत बाबा लोहार यांचेकडे लोखंडी पत्राची पानटपरी बनवून घेतली. सदरची टपरी मी २००२ मध्ये चालू केली. त्याचे सोबत पानटपरी चालवित असतांना चहाचे देखील स्टॉल चालू केले. मला व्यवसाय करायचा होता. म्हणून मी ग्राहकांना कसे आपलेकडे आणता येईल याकरिता ओरडून पानटपरी वरील सामान विकत होतो. मित्रहो म्हण आहे बोलक्याचे बोल सुध्दा विकले जाते तसेच नाबोलक्याचे सोने देखील विकले जात नाही. सदरवेळी मला थोडा त्रास झाला. परंतु मी हार न मानता माझे व्यवसाय चालु ठेवले. या अगोदरच्या काळात गावात लोकांकडे संपर्कासाठी मोबाईल फोन नसल्याने तसचे ठराविक लोकांकडेच लँड लाईन फोन असल्याने सर्वसामान्य्‍ लोकांना अडचणी येत होत्या. त्यासाठी मी गावात माझे स्वामी समर्थ पान सेंटर येथे लोकल कॉलची सुविधा प्रथम सुरु केली. सदरवेळी मला भरपूर लोकांची साथ लाभली. मला कधीही कोणतेही काम करित असतांना कमीपण वाटला नाही. कारण मित्रहो तुम्हाला तुमची परिस्थिती हि सगळे काही शिकवित असते. मी पावसाळयात व हिवाळयात चहाचे स्टॉल लावत होतो. उन्हाळा सुरु झाला की, लिंबु शरबत, कोल्ड्रींक्सचे स्टॉल लावत होतो. तेवढे काम करित असतांना देखील अजून काही जोडधंदा हवा म्हणून वाटत होते.
मित्रहो म्ह्ण आहे की, तुमची नितीमत्ता चांगली असेल तर कोणीही तुम्हाला मदत करित असते. एके दिवशी गावात कॅमेरा विकणारा आला. त्यावेळी माझे दुकानावर आदरणीय श्री. व्ही.डी.वाणी सर हे बसले होते. त्यांनी मला सांगितले की कॅमेरा घेवून टाक व फोटोग्राफीचा व्यवसाय कर. असे सांगितल्यानंतर मी सदरचा कॅमेरा विकत घेतला. सदरवेळी २० ते २५ रोल मध्ये फोटो काढले असतील. परंतु मला कॅमेराबाबत काही एक न समजल्यामुळे मी फक्त फोटो काढत गेलो. मी सदरचे फोटो कसे येतील याबाबत काही एक तपासणी न करता दनादन फोटो काढीत गेलो. त्यावेळी मी फोटो लॅबमध्ये जावून फोटो डेव्हलपींग केले असता सदरचे फोटो खराब आले. म्हणून मला सुरुवातीस फोटो बाबत मार्गदर्शन न घेतल्यामुळे आर्थिक फटका बसला होता. परंतु मी मागेपुढे न बघता डिझीटल कॅमेरा घेवून फोटोग्राफीचा पुन्हा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर मी लग्नसमारंभाच्या ऑर्डरी घेवु लागलो. मित्रहो मी कधीही पैसा पाहून काम केले नाही. मी फक्त माणूस पाहून काम केले आहे. मला लोकांनी कामाचे असतील अथवा उधारीचे असतील जेवढे पैसे दिले तेवढे पैसे मी घेतले आहेत. कोणालाही नाराज केले नाही. मला आजही लहानापासून ते थोरांपर्यंत सर्वजण ओळखतात. मला त्याचा आनंद आहे. मी देत असलेल्या क्वालीटीमुळे मला गावात, अंतुर्ली खु || बांबरुड महादेवाचे, तसेच गावातील लोकांचे नातेवाईक जिथे असतील त्यांना पसंद आले त्यांनी मला फोटो व व्हीडीओ शूटींगच्या ऑर्डरी दिल्या. त्यांचा मी सदैव आभारी राहीन.तसेच मी पेपर वाटत असतांना पिशवीत कॅमेरा ठेवीत होतो. कोणी फोटो काढण्यास सांगितले तर लगेच पासपोर्ट वगैरे फोटो काढून देत होतो. मी देत असलेली सर्व्हिस लोकांना आवडत असल्यामुळे तसेच मी  कमी पैशात काम करित असल्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारा होतो.
मित्रहो,मी उद्योग-धंदयात येण्याआधी शेतीची सर्व कामे केली, तसेच गवंडीचे हाताखाली बिगारी म्हणून काम केले तसेच ट्रॅक्टरवर माती, रेती दगड भरण्याचे काम केले. विहीरी फोडण्याचे काम केले. त्याचप्रमाणे मिळेल तिथे कामासाठी गेलो. मी मांढवी, सुरत, वापी-दमण, सेल्वासा आदी ठिकाणी कामाचे शोधात गेलो. तेथे कामही केले परंतु तेथे काम व्य्वस्थित नसल्यामुळे मी परत गावी आलो आहे. त्यावेळी माझे सोबत बरेच मित्र येत होती.
सन 2011 मध्ये महाराष्ट्र पोलीस भरत निघाली. त्यावेळी माझे मनात काही एक नसतांना तसेच मी पोलिस होईल असे माझे ध्यानीमनी नसतांना मी पोलीस भरतीचा फॉर्म भरला व मी माझे दैनंदिन व्यवसायाचे काम पाहून पोलीस भरतीचा सराव चालु केला. मी सर्वप्रथम सकाळी लवकर उठून पेपरचा गठ्ठा ताब्यात घेवून बांबरुड व्यायाम शाळेत व्यायाम करित होतो. त्यानंतर पेपर वाटून दिवसभर अभ्यास करीत होतो. त्यानंतर सायंकाळी ग्राऊंडवर बांबरुड येथील मित्रांसोबत सराव करत होतो. त्यावेळी मी पोलीस भरतीचा सराव करित आहे असे सांगितल्यावर मला मुले हसायची. कारण माझ बांधा सडपातळ होता. तसेच माझे लग्न्‍ झाले होते व मला दोन मुले होती. म्हणून मी कसा काय पोलीस होणार यावर जास्त्‍ हसत हसायची. परंतु मी माझा सराव चालुच ठेवला.वेळ जसा मिळेल तसा अभ्यास केला.पोलीस भरतीचा शारिरीक व बौद्धिक चाचणीचा नियमित सराव केला. मी सलग तीन महिने सराव करुन नवी मुंबई येथे पोलीस शिपाई म्हणून भरती झालो आहे.जीवनात केलेला संघर्ष हा खूप मोठा गुरु झाला.माझ्यासह कुटुंब आणि गावालाही खूप आनंद झाला.दत्तुबा पोलीस झाला.लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता आपले काम करत रहावे हेच यातून शिकण्यास मिळते. सध्या मी नवी मुंबई पोलीस दलात माझी नोकरी व्यवस्थितरित्या करित आहे.
मित्रहो आपणांस एक विनंती आहे की, जेवढे तुम्ही कष्ट करणार तेवढे तुम्हाला सुखाचे दिवस येणार. तसेच तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन न मिळाल्यास आपण वेगळया वळणावर भरकटू शकतात. म्हणून योग्य मार्गदर्शनाची देखील तेवढीच आवश्यकता आहे. जेवढी तुमची कष्ट करण्याची जिद्द तेवढे यश मिळतेच....
    मला वेळोवेळी माझे आई-वडील तसेच चांगल्या लोकांची साथ मिळाल्याने मी आज सुखी आहे. मला जर माझ्या आई-वडीलांनी कष्ट करण्याची सवय लावली नसती तर मी आज कुठल्या ठिकाणी राहिलो असतो याबाबतची कल्पना न केलेली बरी. म्हणून सांगतो.. आपणांस आई-वडील,मार्गदर्शक जर ओरडत असतील तर कृपा करुन त्यांचे ऐका. तुम्हाला निश्चितच चांगले दिवस येतील…

   मेहनत करण्याची तयारी ठेवा,काय होईल जास्तीत जास्त...वेळच लागेल ना.काही हरकत नाही लागू द्या.हीच वेळेची तुमची बचत अन् सदुपयोग तुम्हांला जीवनात मोठा परतावा देईल.

प्रेरणा एक सुवर्णपान या उपक्रमाव्दारे तुमच्याशी हितगुज करता आलं याचं समाधान आहेच...

*भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...!*

आपला…

(दत्तात्रय परमेश्वर पाटील)
पो.कॉ.नवी मुंबई
मो. 8692827778






































************************************************
************************************************

*प्रेरणा एक सुवर्णपान ब्लॉग*

जिद्द एक प्रेरणा - निंबा पाटील
 http://prerana1suvarnpan.blogspot.in/?m=1

मेहनतीचा दीपस्तंभ- दत्तात्रय पाटील
https://prerana1suvarnpan.blogspot.com/2017/07/blog-post.html?m=0


प्रेरणा एक सुवर्णपान फेसबुक पेज
https://m.facebook.com/preranaeksuvarnpan/

Email प्रेरणा एक सुवर्णपान
preranaeksuvarnpan@gmail.com

whatsapp प्रेरणा एक सुवर्णपान
9665911657

**************************************************

*काही प्रतिक्रिया*

मेहनतीचा दीपस्तंभ - दत्तात्रय पाटील
♻🔮♻🔮♻
 भरत पाटील

खडतर प्रवास खूप शिकवून जातो...गावातल्याच नाही तर अवघ्या महाराष्ट्रातील गृपमध्ये आपली यशोगाथा वाचली जात आहे...
तुम्हाला जवळून ओळखतो...
प्रेरणा एक सुवर्णपान हे व्यासपीठ व्यक्त होण्याचं...स्वतःकडे थोडं वळून बघण्याचं...पाठीमागे पाहिल्यानंतर आपण खूप पुढं आलोय असं वाटत असतानांच एक प्रेरणा गावातील तरूणांना मिळेल अशी भावना निर्माण होण्याचा हा उपक्रम ...
तुमच्या आठवणी ह्याच तुमचं जगण्याचं बळ होय...
आपला प्रवास सुवर्णपानच...
प्रेरक आहात....
प्रेरणा घ्या प्रेरणा द्या...🙏
🏻🙏🏻🙏🏻
 खूप छान...श्री.दत्तात्रय पाटील यांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..नोकरी हे बिरुद जेवढे गोड वाटते त्याहीपेक्षा त्यामागे केलेली कसरत खूप कठीण असते..👍त्याचबरोबर प्रेरणा एक सुवर्णपान टीम चे हि कौतूक..🌷
किरण पाटील लोहटार,

 KISHOR MAHAJAN MUMBAI : Good experience sharing by Dattu, development from multi tasking to streamline in one task.
Normally we are get confused in such cases that after doing many thing, we can't decide what to do? But Dattu finally achieved his goal.👌👌

 JITENDRA PATIL NASHIK : Gr8 Dattuba.. I think this story inspired to 80% of youths... No matter for success of those who is excellent frm. Starting but in fact more than 70% r  average n struggling for carrier in society..... Once again salut to his wil n struggling 👌🏻👌🏻👌🏻👍💐🙏
 ‪+91 98816 88209‬: दत्तू 👍👍👍
तुझे कष्ट आम्ही पाहिले आहेत पण तु महाराष्ट्र पोलीस झाला हे माहित नव्हते तुझे खुप खुप अभिनंदन 💐💐
तुझा अदबीने वागणारा प्रेमळ स्वभाव , जिद्द , सहनशीलता ,  धडपड आठवते आणि हेच यशाचे मार्ग आहेत 

 मित्रा  तुला पुढील धडपडीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐
💐💐💐
 NIMBA PATIL अहमदाबाद,गुजरात : दत्तुबा छान झुंजलास. 👏👏👏👏👏 छान प्रगती केलीस. शून्याच्या पुढे एक लावलास. "Never Give Up"  attitude दाखविले. झुंज सोडू नकोस मित्रा. पूर्णविराम न देता स्वल्पविराम असु दे सध्याच्या परिस्थितीत. होऊन जाऊ दे अजून एक त्या एकाच्या पुढे. भावी वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा. 💐💐💐💐💐

 Kishor Mahajan NASHIK : Really great achievement Dattuba👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
 Hello sir,
Mi tumacha whatsapp msg read kela.
Your hardwork and passion to become success is so amazing.
Tumachya hardworking aani dedication la salaam sir.
Keep it up....
Thankyou for sharing your valuable experience.
☺️🤗🤗
Vishal Pathare

: Very well done dattu ba. Your all story read me.and only on massage in your subject focus on works then any work but important think is efforts in your work.
          All the best. Then in your life is really hero. I salute in effort and continuous worked in your life. Very well sir and next future is bright and enjoyfull.
Preaer to god. 

                    Mr.mansuri nisar nashik.

 क्या बात है...फिरसे वेलकम
प्रेरणा देणारी वाटचाल ...

दिपाली बधुलकर

मेहनतीचा दिपस्तंभ.....दत्तात्रय पाटील ............लोहटारच्या सर्वच सुपूञांचा एक संघर्षमय जीवनप्रवास..
खूप छान उपक्रम निंबा पाटलांप्रमाणेच आपणही मनात घर केलंत...

पृथ्वीबाबा शिरसाठ
मालेगाव

Mehanatiche fal nehami god aste, Great job.   Shital bhagwat choudhari...pune

 Truly inspiring ...rising against all odds, this is called accepting no limits..Best of luck for your future..-Vinod Mahajan

दत्तु बुवा खुप कष्ट घेतले आहे तुम्ही 
खूप छान लेख आहे, Bhatu Patil... bambrud mahadevache

तूमच्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम. Jagdish borse..Dule

Very touching and inspiring story Datta..your future is bright... All the best- Shri Ulhas Kadam,API Navi Mumbai police

Great....
तूमच्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम
Dr.pradhnya bhoir new Panvel

 Nice one mamu..hrudaysparshi ahe tuzi vatchal.. Ajit nikam.panvel😎😎😍👍👌#Aag_Lagadi_Bhai👌👏asalam shekh Navi Mumbai police

👍🏾 कष्टाने हार मानली! व त्या कष्टाचे चिज झाले.🌹👍🏾🌹💐✌आशीच प्रगती होत राहो हीच शुभेच्छा.🌹
💐
 Dattu ani me classmate hoto. to A division la me B division la. me nachankhede yethun jevha bambrud marge Amadade yethe duty la jat tevha to tyachya taparivar asayacha. me tyacha sangharsh roj baghat hoto. to jevha bambrud bhadgaon rastyavar police bharticha sarav karaycha mala sudha vatayache ki vayachya 30th varshi yala kas shakya. parantu Dattu sathi kahich ashakya nahi he mala tyachya jiddivarun samajale. Dattu jevha police zala mala far anand zala hota. adhun madhun me tyanchya taparivar thambun tyachya vadilakade tyachi chaukashi karto. v tyacha adarsh itarana sangto.......sahebrao sonawane nachankheda

: जिवन एक संघर्ष, स्वताच्या मेहनतीने मिळालेले यशात एक वेगळाच आंनद असतो..Bharat Patil Mumbai

: Sir tumhi nannkich mazyasarkhya student sati ek preyaranadayi ahat....veryyy niceee.......virendra Rajput

खूपच सुंदर असे लिखाण आहे सर या तुमच्या लिखाणाने आमच्या गावातील मुले व महाविद्यालय मधील मुले यांना नक्कीच प्रेरणा मिळाली आहे,मी हा लेख आमच्या गृपमध्ये शेअर केलाय...
मी पण एक पेपर विकणारा माणूस होतो,मी पण पेपर ,पाव ,गवंडी काम ट्रॅक्टर ,4 चाकी गाडी,काम ,केले,आहे, आता मी एक चांगल्या पदावर काम करत आहे, मी आज गावातील महाविद्यालयात 
प्रा,निलेश गाडेकर म्हणवून खूप नाव लौकिक मिळवले आहे,मी एक प्राध्यापकांच्या नोकरीस सुरवात केली आहे तुमची प्रेरणा खूप काही देऊन गेली म्हणून 
मना पासून सलाम,,,

प्रा.निलेश गाडेकर
S.D.COLLEGE SOYGAON,AURANGABAD

: Datta I am proud of you...
Tuzi story me baryach thikani sagat asto....
Tu kayam aamchya rudayat aahe....
Tu ashich pragati karat raha aamchya subhechha tuzya pathishi aahet...... Ajay Patil, jalgaon

: आता अधिकारी होण्याचं स्वप्न बघा आणि प्रत्यक्षात उतरवा
Good
All the best👍
Girish Nikam...zee 24 Taas reportar

: Best my freind good.I like and my frontline u r story  ur deep sturger and hard work .I proud Of  my freind --datta patil mumbai police .SALUTE and good progess.-umesh chandankar Pune🔮♻🔮♻♻🔮♻🔮♻🔮♻

3 comments:

  1. सर्व हितचिंतकाना मनापासून धन्यवाद.…

    ReplyDelete
  2. सर्व हितचिंतकाना मनापासून धन्यवाद.…

    ReplyDelete
  3. खूप प्रेरणा मिळाली आपल्या आत्मकथेतून

    ReplyDelete