जाणीवेचा प्रवास - रितेश ब्राम्हणे



🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣

⚜ प्रेरणा एक सुवर्णपान -17⚜

जाणीवेचा प्रवास - रितेश ब्राह्मणे

      बाजरीच्या बणगींचा सारा पसारा सुपात घेऊन उपनावा, त्यातुन भुसा हवेत दूर उडून जावा आणि धान्य असलेल्या बणगींचा ढीग जमा व्हावा,जमा झालेल्या त्या बणगीला धोपटयाने चांगला चांगला चोपुन काढल्यावर माती मिश्रीत धान्याचा खजिना सापडावा,पाण्याने धुतल्यावर बाजरीच्या दाण्यांचा ढीग घरात साचत असे,अहोरात्र जागुन आईने केलेला हा अट्टहास आणि त्या जाणिवेतून घडत गेला माझा शिक्षणाचा प्रवास.

  शालेय जीवनात पाठयपुस्तक व गाईडसची मला कमतरता खूप जाणवायची,मित्रांचे गाईड्स कच्या वहीवर अक्षरक्ष: उतरवत असे. रात्रभर टिमटिमत्या कंदिलात हा प्रवास सारा परिपाठ चालत असे. आर्थिक परिस्थिती तशी फाटकीच होती. उत्पन्नाचा स्त्रोत फक्त आणि फक्त मजूरी हाच होता. पावसाळयात गळकं घर, वस्तीत भांडणांचा रोजचाच कल्लोळ, आर्थिक चणचण या सर्वांची पार्श्वभूमी असताना माझा एकलाच,शिक्षणाचा प्रवास चालत होता. यशाच्या शिखराकडे.

जगण्याची पुरेशी संसाधन नसली की आपलंच मन बंड करत स्वत:शी.

     ५ वी ते ८ वी पर्यंतचा अभ्यास असंमजस होता. पुढे मात्र जिद्द आणि चिकाटीने अनेक संकल्पना स्वत: समजून घेतल्या. दहावीला अभ्यासाची सोय अपुरी होती. दुपारी रानात जाऊन अभ्यास करत असे.रानातल्या झाडाझुडपांसह,पक्ष्यांच्या किलबिलाटात,नीरव शांततेत अभ्यास करत होतो.कुणाशीही स्पर्धा करत नसलेला निसर्ग सोबतीला होता. मित्र विनोद महाजन याने त्याच्या सोबत अभ्यासाची सोय उपलब्ध केली, त्याची खूप मदत झाली याकाळात! दहावी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालो.

       विज्ञानाची आवड होती.१२ वी  विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.अभ्यास कमी पडला. परिणामी १२ वी ला कमी मार्क्स…. त्याचे परिणाम आजपर्यंत सोसत आहे. जीवनाची दिशाच बदलली. दहावीतल्या हुशार विद्यार्थ्याचा मुकुट जो डोक्यावर धारण केला होता तो बाजुला काढून ठेवला व पुढचा प्रवास पुण्यात सुरु केला.

   पुण्यात ॲग्रीच्या ॲडमीशनला गेलो पण ॲडमीशन काही मिळाले नाही. जवळ फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश मिळविला.अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.प्रवास करत होतो.कला, नाटय, वाचन, लेखन यात खूप विकास झाला.विविध कार्यक्रम पाहून अन् प्रत्यक्ष सहभाग नोंदवून समृद्ध होत होतो. तेथून विज्ञानाची पदवी घेतली.परंतु यक्ष प्रश्न होताच. नोकरी कोण देतं?

    सुरु झाला पुन्हा एकदा पोटा-भुकेचा प्रश्न.एक गोष्ट मात्र नक्की.पदवीत असताना मी रात्रपाळीत अनेक काम केली. मला छोट्या पगाराची आणि पदाची लाज वाटली नाही. मिळेल ते काम केली. मार्केटिंग ते बी.पी.एड ऑल सिग्मेंट्स. लहानपणापासून मजुरीचे संस्कार खूप ऊर्जा देऊन जात होते.कामातून शिक्षण करू शकतो ही शिकवण मनात खोलवर उमलत्या वयातच ठाण मांडून होती.

   प्रिय मित्र दिनेश परदेशी याने पुण्यात राहण्याची सोय केली. तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असे. मलाही त्याची ओढ लागली. शेवटी प्रश्न नोकरी हाच होता.

बी.पी.ओ त रात्रपाळीत काम आणि दिवसा पुणे विद्यापीठात जयकर ग्रंथालयात अभ्यास. जिद्द चिकाटीने अभ्यास केला. २००५ च्या पी.एस.आय पदासाठी प्रथम परीक्षा उत्तीर्ण झालो. पदराचे (जवळचे) पैसे सगळे संपत आले. माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च मी स्वत: करत असे, पुन्हा नोकरी आणि अभ्यास सुरु. अपयशाची गाथा संपत नव्हती.रेल्वे, एच.पी.सी.एल, इरिगेशन अनेक मुलाखती देत गेलो परंतु यश पदरात पडत नव्हतं.

व्ही.एस.एन.एल च्या एका बी.पी.ओ त अर्धवेळ नोकरी करत अभ्यास केला. कामाला जाताना पोटात पुस्तक लपवून नेत असे.मिळेल त्या मिनिटाला एक ओळ जरी वाचायला मिळाली तरी तो अभ्यास.अशा प्रकारे सराव चालु होता.अनेक परीक्षा येत आणि जात. यश मात्र जैसे थे! पुढे स्टेट बँक ऑफ इंडिया ने जाहीरात प्रसिध्द केली. त्यात अर्ज केला. आता तर पैसे सगळे संपले, पुन: काम सुरु रात्रपाळी, दिवसा अभ्यास परीक्षांचा इतका सराव झाला होता की मी परीक्षेच अजिबात दडपण घेत नसे. अनेक परीक्षा दिल्या. अगदी म्हणजे श्रीनगर रेल्वेचा सुध्दा पेपर दिला. कर्नाटक, केर,अजमेर नाही तेथे डोक मारत राहिलो. रात्रपाळी संपवुन एके दिवशी सकाळी ८ वाजता गरवारे कॉलेजला एस.बी.आय चा पेपर दयायला हजर! चहा पिलो आणि पेपर सुरु, जीवाचा आकांत झाला. वेग संवेग सारा दाटुन आला.पुरता, कंटाळलो होतो.पेपर सोडवला. पुन्हा प्रतिक्षा होती ती मुलाखतीची. इतका मला विश्वास होता की मी पास होणारच! 
पास झालो! यावेळी सुध्दा मुलाखत दगा देणार पण दैव बलवत्तर आणि पास झालो. मला mouth ulcer होता, बोलताही येत नव्हतं. परिक्षकांची क्षमा मागून मुलाखत देत राहीलो. एकावर एक प्रश्न आणि त्यात उत्तरं देत आता थकलो.
नशिबाचे फासे काही औरच असतात एकदा सहा घर पडली की माणूस कसा यशाची पायरी वर-वर जातो कळत नाही.
माझ्या पुढे SBI मध्ये Accountant & Cashier या पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यातच करीयर करीत आहे. प्रवास पुढे चालु आहे.

    समस्यांचा पाढा वाचत न बसता,त्या सोडविण्यावर भर द्या.वाटेला आलेल्या क्षणाचा पुरेपूर जीवनात वापर करा.एक क्षण जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणू शकतो.स्पर्धेच्या जगात वावरतांना दमछाक होतेच पण शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची तयारी ठेवा.सर्वांत महत्त्वाचे स्पर्धा ही स्वतःशी करा.स्वतःविषयी चिंतन करतांना उणीवा शोधा अन् त्या दूर करण्याचा प्रयत्न करा.स्वतःवर भरपूर विश्वास ठेवा अन् आत्मविश्वास वाढवत रहा.जिद्द,चिकाटी अन् भरपूर झोकून देऊन मेहनत करण्याची तयारी असेल तर यश आपलेच.
शुभेच्छा..!

समस्त मित्रांचे आभार !
समस्त शिक्षकांचा ऋणी !

रितेश ब्राम्हणे
SBI,ACCOUNTANT & CASHIER

🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣

🌄 होळीच्या हार्दिक शुभेच्छा🌄

♻ *प्रेरणा एक सुवर्णपान फेसबुक पेज*
https://m.facebook.com/preranaeksuvarnpan/

⚜🎯⚜🎯⚜🎯⚜🎯⚜🎯⚜

💎 *प्रेरणा एक सुवर्णपान ब्लॉग*💎
https://prerana1suvarnpan.blogspot.in/p/blog-page_2.html?m=0

♻ *Email प्रेरणा एक सुवर्णपान*
preranaeksuvarnpan@gmail.com

♻ *whatsapp प्रेरणा एक सुवर्णपान*
भरत पाटील- 9665911657

🔮🎇🔮🎇🔮🎇🔮🎇🎇🔮🎇

*प्रेरणा एक सुवर्णपान Broadcast ला ॲड व्हायचे असल्यास 9665911657  नंबरवर whatsapp करा.दर पंधरवाड्यात दीपस्तंभ आपल्या भेटीला...स्वअनुभव रेखाटत*

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

No comments:

Post a Comment