STRIVING FOR PERFECTION - ABHIJIT CHAUDHARI

🍂
🎯⚜🍂🎯⚜🍂🎯⚜🍂🎯

🔮 प्रेरणा एक सुवर्णपान-5🔮

Striving for perfection -Abhijit Chaudhari

        नेहमीप्रमाणे ग्राऊंडवर क्रिकेट खेळत असताना माई बोलवायला आली.म्हणत होती की, आनंदाची बातमी आहे.मी विचारले मामा आला आहे का, तो अन् मी मित्रासारखे आहोत. तो आला की मला खूप आनंद होत असे.पण माई नाही म्हटली. मग काय झाले तर सांगायला तयार नव्हती,म्हणाली,“तुला घरी यावे लागेल”. मित्रांची रजा घेत मी घरी गेलो तर घरी नवोदयमध्ये निवड झाल्याचे पत्र आलेले होते. मला खूप आनंद झाला, पण घरच्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि भय दिसत होते.

      अनायासाने नवोदय वाले शाळेमध्ये आले होते, इयत्ता चौथीत ठाकरे गुरुजींनी स्कॉलरशिपची खूप तयारी करवून घेतली होती.त्यामुळे पप्पांनी विचार केला होता की मला नवोदयसाठी बसवून देऊ. सेलेक्शन होईल अथवा नाही होणार हा पुढचा भाग पण झाले तरी नाही पाठवायचे हा विचार त्यांनी पक्का केला होता.
माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कदाचित त्यांना कळाले असेल की माझ्या मनात काय आहे.

     लहानपणी निंबा पाटील, जयंत महाजन, विनोद महाजन आणि किशोर महाजन यांच्याबद्दल ऐकून होतो.मनात होते की चांगल्या शिक्षणासाठी घरातून बाहेर पडावेच लागेल.
घरच्यांनी विचारल्यावर मी जायची तयारी दर्शविली आणि घरच्यांची शंका आता सत्यात अवतरली होती.मग पुढचे प्रश्न,तु तर तुझ्या आईला सोडून कुठेच गेला नाहीस, राहणार कसा, स्वत:च्या हाताने सगळे करावे लागेल, तुझे वय पण खूप कमी आहे, फक्त 10-11 वर्षाचा आहेस ,खूप लहान आहेस अजून.पण मनात जिद्द होती. मी म्हटले,मी जाणारच.पप्पांनी थोडा वेळ विचार केला. बघुया एवढंच उत्तर मिळाले होते.

    आमचे गाव वाघळी. तिथल्या घराच्या बाजूचा एक मुलगा नवोदयला आहे म्हणून कळले.  त्याचे घर गाठले व सर्व माहिती गोळा केली.ठरवले की जा म्हणून,पण चिंता आणि काळजी घरच्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तयारी चालू झाली. लागणारे सर्व सामान घेतलं आणि तो दिवस उजाडला जो माझ्या आयुष्यात खूप काही बदल करुन गेला.

     नवोदयला पोहोचल्यावर ॲडमिशनची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि संध्याकाळ होताच मला सोडून घरी जायची वेळ झाली, आई तर हुंदके देऊन रडत होती आणि पप्पांचे डोळे पाणावले होते पण वडील कसे रडणार म्हणून तोंड फिरवत होते. मलापण खूप रडू आले.
वेळ झाली अन् ते गेलेत, आता मी एकटा होतो. कुणीच नव्हते ओळखीचे, मनात भिती नाही पण थोडेसे बावरलेले वाटत होते, सर्व नवीन होते.रात्री जेवन झाल्यावर झोप लागत नव्हती. खूप गहिवरुन आले होते.चादर तोंडावर घेऊन धाय मोकलून रडत होतो.खूप कासाविस होतो. पण म्हणतात ना की, *जेव्हा माणूस एकटा होतो अन् त्यांच्या जवळ मदतीला कुणीच नसते तेव्हा त्याची हिम्मत त्याच्याजवळ असलेल्या विचारांची शिदोरीच त्याची मदत करते.*लहानपणी बाबांकडून ऐकलेल्या पंचतंत्र, अकबर-बिरबल च्या गोष्टी अन् त्यांचे अनुभव, पप्पांनी सांगितलेली त्यांचे मामा एम.टी.तेली यांची गोष्टही आठवून मनात जिद्द आली अन् ठरवले, बस्स, आता रडायचं नाही, काहीतरी करुन दाखवायचे, हा माझा निर्णय आहे, तो वाया जाणार नाही. अन् शांत झोपलो.

     दिवसागणीक दिवस जाऊ लागले.आता घरचे पण बऱ्यापैकी स्टेबल झाले होते आई सोडून.जी कधीच स्टेबल होणार नव्हती,कारण आई ना ती.
टॉप 5 मध्ये असायचो.खूप कमी अभ्यास.खेळण्यात जास्त लक्ष, सातवीला असताना कबड्डी अन् हॉलीबॉलसाठी क्लस्टर अन् रिजीनल ला सेलेक्शन झाले होते. पुढे दरवर्षी क्लस्टर अन् रिजीनल नेहमीचेच झाले होते.क्रिकेट, कबड्डी,हॉलीबॉल,कॅरम,चेस,इ. असे सगळे खेळ अन् अभ्यासातली एकाग्रता मला ऑल राऊंडर म्हणून ओळख देऊन गेली.आठवीला असताना एका सरांनी सांगितले की,तु खूप हुशार आहेस,शिवाय खेळात पण निपूण आहेस.आयुष्यात तुला जर काही व्हायचे असेल तर त्यासाठी तुला तुझ्या क्षेत्रातलीच नाही तर ज्या ज्या गोष्टी तु करतोस त्यात परफेक्शन अचिव करावं लागेल.परफेक्ट झालास म्हणजे तु कॅपेबल झालास त्या त्या गोष्टीत विशेष प्राविण्य मिळवण्यासाठी हे वाक्य मनात घर करुन गेले.गुरु पौर्णिमेला ठाकरे गुरुजींची चिठ्ठी आली होती.त्यात त्यांनी सांगितले होते की, स्वप्न बघायला शीक.ते तुला ध्येय देईल अन् तु तुझ्या प्रयत्नांनी ते साध्य करुन एक यशस्वी होशिल. माझे ध्येय काय होते मलाच माहित नव्हते.पण मनाशी ठरवले जे करणार त्यात परफेक्ट व्हायचे. 

    अभ्यास चालू झाला,जो नेहमीप्रमाणे नव्हता,पप्पा म्हणायचे की अभ्यास किती केला यापेक्षा किती आत्मसात केला याला महत्व आहे.मग प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची. ती काय आहे अन् त्याने काय होते हा एक सोपा फॉर्मुला अन् परत येणाऱ्या प्रत्येक उत्तराला हया फॉर्मुल्याने मल्टीपल लेव्हलला घेऊन जायचे.निकाल यायला लागला होता.मी टॉप केले.मॅथ अन् सायन्स मध्ये चांगली पकड बसली.अभ्यास कमीच होता,पण चिंतन अन् चॅलेंज वाढले.तुम्ही जर 5 किलो वजन उचलत असाल तर तुम्हाला 7 किलो वजन नाही उचलता येणार, तुम्हाला 7 किलो वजन पेलण्यासाठी तेवढा परफेक्ट अन् कॅपेबल व्हावे लागेल.असेच जबाबदारी अन् करीयर म्हणजे सोशल आणि प्रोफेशनल लाईफचे आहे.वर्गात टॉप करुन आनंदी झालो.सोशल कोशंट वाढवायला पाहिजे मग अवांतर वाचन सुरु केलं.मृत्युंजय, श्रीमंतयोगी यांसारखे मोठी आणि प्रसिध्द पुस्तके वा त्यासोबत स्वामी विवेकानंदांचे जीवनचरीत्र. मग कळाले की परफेक्ट होण्यासाठी नुसतं प्रयत्न पुरेसे नाहीत. प्रयत्न योग्य दिशेने व्हावेत म्हणजेच स्मार्ट वर्क ज्याने हार्डवर्क कमी होते व योग्य दिशेने वाटचाल करता येते.मग स्मार्टवर्क,नववीला असताना एनसीसी सार्जेंट झालो अन् आरडी परेड सेलेक्शन झालं. त्यासाठी असलेली परीक्षा आणि इंटरव्ह्यु सहज क्लीअर केले होते.कॅम्पसाठी शाळेला न मिळालेल्या अनुदानामुळे ते कॅन्सल झाले.खूप वाईट वाटले. पण खचलो नाही.दहावीचा अभ्यास सुरु झाला.एका शिक्षकांनी माझ्यावर अविश्वास दाखवला अन सांगितले की तुला कमी मार्क मिळतील.खूप वाईट वाटले, डिप्रेस्ड झालो होतो.पण विचार केला,असे वाटून घेतले तर माझाच लॉस आहे.म्हणून ॲनॅलिसिस करायला लागलो की मला काय नवीन करता येईल कारण "Toppers does not do different things, they do same thing but differently"हे वाक्य मनात आल्यावर मी लगेच प्लॅनिंग करायला लागलो.जुनी प्रश्न पत्रिका आणि सिल्याबस सोबत घेऊन ॲनॅलिसिस केली की,3 तासात 100 मार्क कसे कव्हर करायचे,प्रत्येक चॅप्टरला किती वेटेज द्यायचे अन् किती वेळ कारण नुसते एकदा वाचून नाही होणार,कुठलीही गोष्ट पूर्ण समजण्यासाठी किंवा ती मनात बसण्यासाठी पुनरावृत्ती आवश्यक आहे.सुट्टीमधे घरी आल्यावर,आई स्वयंपाक करत असताना मी आईच्या बाजूला अभ्यासाला बसत होतो.आई मला हे कळत नाही,समजावून सांग ना,जेमतेम शिक्षण असणाऱ्या माझ्या आईला सायन्स अन् मॅथ काय कळणार होते.पण ती म्हणायची परत एकदा वाच.आई मला थोडे कळाले आहे पण हे कसे ते कळत नाही.मग आई म्हणायची ,परत एकदा वाच,असे करत काही पुनरावृत्तीनंतर ती गोष्ट मला कळत होती.  हे सगळे मनात ठेऊन मी पूर्ण वर्षाचा प्लॅन केला. अन् तयारीला लागलो. याचा परीणाम म्हणजे मी 1st Prelim ला टॉप केलं. 

       जानेवारी महिन्यात पप्पा भेटायला आले होते.मला म्हणाले घरी चल.मी ठरवलेला अभ्यासाचा प्लॅन पूर्ण करायचा म्हणून पप्पांना नको म्हटले.पण पप्पांनी सांगितले की,तात्या वारलेत म्हणजे माझे काका, माझ्या पायाखालून जमीन सरकली,आमच्या कुटुंबात पहिल्यांदाच हा एवढा मोठा आघात झाला होता.शिवाय मला त्यांचा खूप लळा होता लहानपणापासून.बैलगाडीवर बसून फिरायचे,नदीकाठाची सिताफळे,बोर,जांभूळ,जत्रेतली जलेबी अन् भरपूर काही लहानपणापासूनची ही सर्व केलेली मज्जा डोळयासमोर फिरायला लागली.दशक्रिया विधी मला करायची होती,कारण त्यांची मुले खूप लहान होती.खूप लहान म्हणजे ज्यांना काहीच कळत नव्हते.आज सुध्दा हया सर्व आठवणींनी मन गहीवरुन येते. खूप शॉक्ड झालो होतो पुढे अभ्यासात ढिला झालो.मन एकाग्र होत नव्हते अन् प्लॅन पूर्ण नाही झाला.मी तिसरा आलो. 

       पुढे 11वी, मग 12 वी आणि इंजिनिअरींग कॉलेजला ॲडमिशन मिळवली,इंजिनिअर व्हायचे हे माझे स्वप्न होते,ध्येय नाही.इंजिनिअरींगला पहिले 2 वर्षे एवढे काही खास नव्हते. सर्वसाधारण विद्यार्थी होतो. पप्पांचे एक वाक्य होते.आपण बुध्दीजीवी आहोत,शेती नाही किंवा व्यवसाय नाही.माझ्याकडे एवढे पैसे आहेत की ज्यातनं मी तुला 2 म्हशी घेऊन देऊ शकतो. मग तु जाण आणि त्या म्हशी.हे ऐकून भानावर आलो. मी कुठे कमी पडतोय याची ॲनालिसिस केल्यावर कळाले की मी माझा फॉर्मुला विसरलोय,जे ठरवले होते ते नाही केले इथे मला हे कळाले की यशस्वी होण्यासाठी स्मार्टवर्क, एफर्टस् किंवा परफेक्शन पुरेसे नाही.त्यासोबत कंसिस्टंसी असावी लागते. पप्पांनी सांगितले होते की, कंसिस्टंसी हवी.कंसिस्टंसीनेच असाध्य साध्य करता येते. म्हणून परत एकदा परफेक्शनचा फॉर्मुला अपडेट केला अन प्रयत्नांना लागलो. निकाल आला.टॉप केलं अन प्रेस्टीज मिळविली.नंतर परीक्षेची तयारी करण्यासाठी सर्व मित्रमंडळही फ्लॅटवर असायची. तु शिकव आम्हाला.तु सांगितले की कळते,सेंड ऑफ मध्ये मित्रांनी तोंडभरुन स्तुती केली की आम्ही तुझ्यामुळे इंजिनिअरिंग पास झालो.

       शेवटच्या वर्षाला असताना प्लेसमेंट झाली.टाटा मोटर्स ड्रिम स्टेटस होते.टाटा मोटर्सला डिझाईन डिपार्टमेंट नाही मिळाले म्हणून मी दुसरी एम.एन.सी. कंपनी प्रॉडक्शन इंजिनिअर म्हणून जॉईन केली.प्रॉडक्शनला जॉब करताना मोबदला खूप मिळत होता पण लक्ष लागत नव्हते.दररोज ऑफिस जायचा कंटाळा वाटत होता.तीच ती माणसे अन काम करण्याची इच्छा वाटत नव्हती.काहीच नवीन नाही.पप्पांशी बोलल्यावर पप्पा हसले,म्हणाले अरे तुझे लक्ष नाही,असे कधीच होणार नाही की नवीन करायला काहीच नाही, किंवा प्रत्येक दिवस सारखाच आहे, कुठल्याही कामात मन गुंतवून ठेवायचे असेल तर तुझ्या ध्येयाशी जोडायचे म्हणजे ते काम तुला बर्डन न वाटता पॅशन होईल अन् ध्येयाकडे तुझी वाटचाल जलद गतीने होईल. तुझ्या युनिकनेसला धरुन जर तुझे कार्यक्षेत्र असेल किंवा जॉब असेल तर तो तुला जॉब सॅटीस्फॅक्शन तर मिळवून देईलच पण सोबत प्रसिध्दी अन नावलौकीक मिळवून देईल.पप्पांना पण शिकवण्याची आवड होती, ते म्हटले,मला कधीच सुट्टी घेऊ असे वाटत नाही.अन् कधीच थकवा येत नाही.कारण Being Teacher हे क्षेत्र मला आवडते, पप्पांनी सांगितले होते की, "प्रत्येक व्यक्ती हा युनिक असतो,गरज असते तर त्याच्या युनिक क्वालिटीला ओळखण्याची,पण ती त्याला स्वत:लाच ओळखावे लागते ",खरे आहे तुमच्या मनात काय आहे किंवा तुम्ही कशात निपूण आहात हे तुम्हीच स्वत:ला विचारायला हवे,ते समोरचा व्यक्ती नाही सांगू शकत,पण कसे ओळखणार हा प्रश्न.त्यासाठी अवांतर वाचन खूप उपयोगी ठरते.स्वामी विवेकानंद म्हणतात की मन अन बुध्दी असे मनाचे बरे अन वाईट ठरवते,जसे मन म्हणजे तुमची इच्छा अन बुध्दी हा तुमचा विवेक असतो,म्हणजे तुमच्यासाठी काय चांगले आहे किंवा वाईट आहे हे तुम्हाला बुध्दी सांगते अन् मनाला तर चांगल्या अन वाईटची काहीच संकल्पना नसते,ते फक्त आपल्या आवडीचे हवे ते घेते,मग जर तुमचा युनिक पॉईंट बघायचा असेल तर तुम्हाला बुध्दी तल्लख करावी लागेल अन त्यासाठी तुम्हाला पुस्तकांचा आधार घ्यावा लागेल, मी पण हेच केले.

       बस.. मनाशी ठरवले अन प्रॉडक्शनचा जॉब सोडला होता. घरच्यांना न सांगता खूप मोठे धाडस अन निर्णय घेतला होता. पुढे काय होईल याचा विचार न करता.भिती वाटत होती.पण विचार केला,जर आयुष्यात अडचणी किंवा रिस्क नसणार तर आयुष्याची मजा नाही. बाबांना बघत होतो माझ्यासमोर रिटायर झाले अन संध्याकाळी त्यांच्यासोबत हितगुज करतांना. त्यांचे स्ट्रगल किंवा बरे आणि वाईट अनुभव, रिस्क शेअर करताना त्यांना खूप गर्व वाटायचा,म्हणायचे, तेव्हा असे केले म्हणून आज गर्व वाटतो. मलापण हा गर्व अनुभवायचा आहे,हा विचार मनात केला होता. स्वप्न होते डिझाईनला जॉब करायचं, अभ्यास चालू होता.तयारी चालू होती अन मनात जिद्द होती,वाटंच बघत होता एका संधीची,अन ती मिळाली.इंटरव्ह्यु शेड्युल झाला.10-15 मिनीटे चाललेली मुलाखत संपवून सगळे बाहेत येत होते.मनात आनंद होता की संधी मिळाली आहे.मनात ठरवले अन प्लॅन करत होतो की,या संधीला यशस्वी करण्यासाठी काय नवीन करता येईल.माझा नंबर आला अन मुलाखत सुरु झाली. आत्मविश्वास भरलेला होता. सगळया प्रश्नांची उत्तरे सहज देत होतो.अवेअरनेस,आत्मविश्वास, तांत्रिक माहिती यांची उत्तम सांगड घातली होती.मुलाखत 45 मिनीटे चालली.बाहेर आल्यावर नक्की झालं होतं की निवड होईलच म्हणून.मनात जल्लोषाची तयारी करत होतो. पण निकाल आला रिजेक्ट चा.खूप नाराज झालो होतो.मुलाखत पॅनलमधले एक सर बाहेर आले अन म्हणाले की, We required CAD also. खूप वाईट वाटले होते. रुमवर आलो.रडायला येत होते. जुना जॉब सोडला होता.आता काय करणार घरी कसे सांगणार हया प्रश्नांनी मन कासाविस झाले होते.शांत विचार केला, ॲनालिसिस केले कुठे कमी पडलो.उत्तर मिळाले. CAD. 

      दुसऱ्या दिवशी अपोलो टेक्नॉलॉजी मध्ये गेलो अन CAD साठी विचारणा केली.CAD चा कोर्स सुरु झाला.सकाळी 9 ते 11 ची बॅच होती.पण मी अन माझा एक मित्र रात्री 9 वाजेपर्यंत प्रॅक्टीस करायचो.कोर्सला फी कमी भरली होती,मेहनत जास्त घेत होतो म्हणून अपोलो हेड ने एक ऑफलाईन प्रोजेक्ट दिला डिझाईनचा त्याला ॲनालिटीकल डिझाईन करुन CAD मॉडेल बनविले होते. प्रोजेक्ट परफेक्ट झाला म्हणून सरांनी शाबासकी दिली. कोर्स संपला अन घरी आलो होतो. 2 दिवस झाले होते. घरी काहीच सांगितले नव्हते जॉबबद्दल.अचानक रात्री एक कॉल आला.अपोलोचे मालक होते.उद्यापासून जॉईन हो, ऑफलाईन प्रोजेक्ट अन सोबत लेक्चरशिप साठी खूप आनंद झाला.मग घरच्यांना सांगितले की मी आधीचा जॉब सोडला अन उद्यापासून नवीन जॉब.आता मी डिझाईनला जॉब करणार होतो. आधी 15 जनांची एक बॅच मिळाली.टेक्नीकल अन् ग्राफीक्स चांगले असल्यामुळे अन् काहीतरी नवीन करायची सवय असल्यामुळे माझे शिकविणे मुलांना खूप आवडले अन् ख्याती पसरत गेली, खूप पॉप्युलर झालो,सरांनी 15 दिवसात पगार वाढवला अन सगळया बॅचेस माझ्याकडे दिल्या.मी फक्त शिकवायचे अन बाकी स्टाफ प्रॅक्टीस करुन घेणार.एका महिन्यात 60 विद्यार्थ्यांची एक बॅच झाली होती. पण स्वप्न वेगळे होते.टाटा मोटर्समध्ये जॉईन व्हायचे.त्याचा पाठलाग पूर्वीसारखा चालूच होता.दुसऱ्या महिन्यात संधी आली.इंजिन डिपार्टमेंटला जागा आहेत म्हणून.मुलाखत निश्चित झाली.रात्रभर जागून इंजिनचा अभ्यास केला होता.सर्व तयारी करुन टाटा मोटर्सला पोहोचलो, मनात तीच जिद्द अन आत्मविश्वास होता.पण नशिबात काहीतरी वेगळेच होते. Position on Hold म्हणून खूप नाराज झालो.मनात असंख्य विचार होते.लढाई न लढताच मी हरलो होतो.खूप वाईट वाटत होतं.पोटभरुन जेवन केलं अन सरांची वाट बघत होतो.मनात विचार करत होतो.कदाचित मी परफेक्ट नसणार,काहीतरी चुकले असेल. अजून काहीतरी तयारी बाकी असेल.सरांचा कॉल आला. अरे HR डिपार्टमेंटला ये लगेच, मी पोहोचलो, Chassis Department ला जागा आहेत अन मुलाखती चालू आहेत. प्रयत्न करणार का. पण लक्षात ठेव प्रयत्न फेल गेला तर 3 किंवा 6 महिने परत संधी नाही मिळणार.मी थोडा विचार केला अन हो म्हणालो.स्वत:वर विश्वास होता.टेक्निकल पक्क आहे अन आता तर CAD पण आहे सोबत. 10 उमेदवारांचा शेड्युल होता. त्यात मला बसवले.मी 11 वा होतो,माझी मुलाखत शेड्युल नव्हती त्या डिपार्टमेंटसाठी. तरीही मला संधी मिळाली होती अन त्याला पूर्ण करायची मी रिस्क घेतली होती.कारण जर फेल झालो तर ही माझी शेवटची संधी असेल.नको तो विचार नकोच. आता मुलाखत देऊया. मुलाखतीला गेलो. मुलाखत झाली,निकालाची वाट बघत होतो. मनात विचार करत होतो की नशीब काय असते.अन चांगले कसे अन वाईट कसे, सगळयांची मुलाखत झाली. निकाल आला.मी सेलेक्ट झालो होतो अन बाकी 10 रिजेक्ट झाले होते. खूप आनंद झाला होता. *perfection,capabilities, confidence, consistency and dream सगळे काही पूर्ण किंवा सार्थक झाल्यासारखं वाटत होतं.* त्यादिवशी मनात ठरवले. फॉर्मुला स्ट्राँग आहे.याला अंमल करुन कंसिस्टंट राहूया.
जॉईनिंग झाली.अविस्मरणीय सकाळ होती, व्हाईट शर्ट अन ग्रे पँट युनिफॉर्म घालून ऑफिसला आलो,नवीन लोक,नवीन जागा, नवीन कामाचे वातावरण सर्व काही नवीन,फक्त मी जुना होतो. वयाच्या 10-11 व्या वर्षी घर सोडलेलं.स्वप्नाचा पाठलाग करत आलेलो, *यश मिळविणे एकवेळा सोपे असते पण ते टिकवून ठेवणे खूप अवघड असते*. खूप efforts लागतात, म्हणून मी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबत होतो,नवीन काही शिकण्याचे असेल तर जागरुक असावे लागते हे सगळयात महत्वाची गोष्ट आहे ,म्हणून ऑफिस वेळेनंतर थांबून मी vehicle layout आणि  other technical parameters बद्दल शिकू लागलो,थोडयाच दिवसात ख्याती पसरु लागली solution oriented आणि positive thinking अशी माझी ओळख झाली,सगळयांना मदत करणे हे नेहमीचे झाले. पण ही ओळख पुरेशी नव्हती.पुढच्या पायरीला जर पोहोचायचे असेल किंवा प्रमोशन हवे असेल तर त्यासाठी त्या पोस्टला कॅपेबल व्हावे लागेल म्हणून मी आयडल ठेवायचं ठरवलं की ज्याला बेंचमार्क करुन मी पुढे जाऊ शकतो,म्हणून मी रिपोर्टींग मॅनेजरला आयडल ठरवलं.अन् त्यांच्याकडून इनिशिएटीव्ह आणि जबाबदारी या क्वालीटी शिकलो.रिजल्ट होता 1.5 वर्षात प्रमोशन.आता मी सिनियर इंजिनिअर झालो. वयाच्या 23-24 व्या वर्षी मी ही पोस्ट घेतली,critical issues resolution मध्ये मी भाग घेणे हे नेहमीचे झाले अन ओळखही, खूप रीस्पेक्ट मिळाल्या सारखे होते, AGM सरांना तर मी अन माझा रिपोर्टींग मॅनेजर म्हणजे जादुगर वाटायला लागलो होतो, critical issue resolution with speed to meet the target line साठी ग्रुप मधून employee of the year चा ॲवॉर्ड मिळाला. प्रोग्रेस खूप छान चालू आहे पण अजून काहीतरी मोठे हवे म्हणून कंपनीच्या FTS (fast track selection) process मध्ये भाग घ्यायचे ठरवले. हया प्रोसेस मध्ये सेलेक्ट झाल्यावर BITS pilani मधून M.Tech कंपनी स्पाँसर करणार होती,माझी खूप इच्छा होती करायची,पण तोवर लग्न झालेले अन लहान मुलगा होता, पत्नीला विचारले तर ती म्हणाली जरुर करा,मी सांभाळते सगळे घर अन परिवार,माझी पत्नी म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड.जी माझ्या सुख दु:खात मला सावरत अन गाईड करत. स्वप्नाकडे वाटचाल करायला प्रोत्साहन करत होती,अशीच साथ हवी म्हणून आम्ही लग्न केलेले,त्यात सर्व कुटुंब अन् नातेवाईकांना सांभाळण्याची जबाबदारी ती एकटी पेलणार होती, कारण मला जर करीयरवर लक्ष द्यायचे असेल तर diversion नको म्हणून,अन तीने ती जबाबदारी अगदी सहज पेलली.माझे सर्व नातेवाईक आनंदी होते.माझे पुण्यात स्वत:चे घर झाले होते हे सगळे माझ्या पत्नीने एकटीने केले.कारण मी तर वेगळयाच तयारीत होतो. M.tech ला सेलेक्शन झाले होते. BITS pilani मधून शिकणार होतो.पूर्ण पगार चालू राहणार,कोर्सची फी कंपनी भरणार,स्टेशनरीचा खर्च पण कंपनीच, जणू दुसरे नवोदय वाटत होते.दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचे, संध्याकाळी लेक्चर 4 तास,अन मग घरी, रात्री अभ्यास,असा नित्यक्रम चालू झाल,पत्नीने सर्व अगदी व्यवस्थित सांभाळले होते, अशी 2 वर्षे पूर्ण झाली अन M.tech पूर्ण झाले हयाचे सर्व श्रेय मी माझ्या पत्नीला अन मुलाला देतो की त्यांच्या पाठींब्यामुळेच हे शक्य झाले. अन आतापर्यंतचा प्रवास, घरच्यांची शिकवण, M.tech च्या दुसऱ्या वर्षाला असताना म्हणजे मी 27-28 वर्ष वयाचा असताना मला प्रमोशन मिळाले मी technical lead झालो.
नवीन प्रोजेक्टवर काम करायची संधी मिळाली. concept phase पासून on road project vehicle run पाहताना खूप गर्व होतो.

         मी माझे ध्येय ठरवले की आपल्या क्षेत्रात परफेक्ट व्हायचे. मला वाटते, की आनंदाने जीवन जगणे, आलेल्या संकटांचा सामना करणे,संधीचं सोनं करणे अन सगळयांना सोबत घेऊन चालने हयापेक्षा जीवन काही वेगळे नसेल,रोटी कपडा मकान हया आपल्या मुलभूत गरजा आहेत.त्यांना साध्य करत स्वप्नांचा पाठलाग करायला खूप छान वाटते. *कुठलेही ध्येय साध्य करायचे असेल तर त्यासाठी मनात पक्का निर्धार,त्याबद्दलचा वाटचालीचा प्लॅन,त्यासाठी लागणाऱ्या क्वालीटी आत्मसात करणे,efforts to improve yourself, consistency, patience, confidence हया गोष्टी कॅपेबल बनवतात अन मग तुम्हाला ते ध्येय मिळते.

👉🏻 अभिजीत चौधरी
       टेक्नीकल लीड-डिझाईन
       टाटा मोटर्स

**********************************************************************************************🍂🎯🔮🍂🎯🔮🍂🎯

💎 *प्रेरणा एक सुवर्णपान ब्लॉग* 💎

https://prerana1suvarnpan.blogspot.in/p/blog-page_2.html?m=0

⚜ *जिद्द एक प्रेरणा - निंबा पाटील*
https://prerana1suvarnpan.blogspot.in/p/blog-page.html?m=0

⚜ *मेहनतीचा दीपस्तंभ- दत्तात्रय पाटील*
https://prerana1suvarnpan.blogspot.in/p/2.html?m=0

⚜ *“Believe in Consistent Efforts”- Kishor Mahajan*
https://prerana1suvarnpan.blogspot.in/p/blog-page_31.html?m=0

⚜ *परिस्थिती हीच शक्ती - विजय शिंपी* 
https://prerana1suvarnpan.blogspot.in/p/4.html?m=0

⚜🎯⚜🎯⚜🎯⚜🎯⚜🎯⚜

♻ प्रेरणा एक सुवर्णपान फेसबुक पेज
https://m.facebook.com/preranaeksuvarnpan/

⚜🎯⚜🎯⚜🎯⚜🎯⚜🎯⚜

♻ Email प्रेरणा एक सुवर्णपान
preranaeksuvarnpan@gmail.com

♻ whatsapp प्रेरणा एक सुवर्णपान
भरत पाटील- 9665911657

🔮🎇🔮🎇🔮🎇🔮🎇🎇🔮🎇

प्रेरणा एक सुवर्णपान Broadcast ला ॲड व्हायचे असल्यास 9665911657  नंबरवर whatsapp करा.दर पंधरवाड्यात दीपस्तंभ आपल्या भेटीला...स्वअनुभव रेखाटत

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

No comments:

Post a Comment