Perseverance - Inspiration of Success - Nilesh Malpure



प्रेरणा एक सुवर्णपान-9

Perseverance - Inspiration of Success - Nilesh Malpure

      एकत्र कुटुंबाचं माझ्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व.आम्ही पाच भावंडे त्यात मी सर्वात लहान.ग्रामपंचायतीसमोरील कौलारु शाळा माझ्या आयुष्यातील पहिली शाळा. श्रीमती मराठे ताई हया बालवाडीच्या वर्गशिक्षिका. आम्ही सर्वांनी बालवाडीत नियमित न रडता आनंदाने बसावे यासाठी ताईंनी खूप प्रयत्न केले आणि ताईंच्या या प्रयत्नांमुळेच मलाही शाळेत जाणे आवडू लागले.खरा शिक्षणाचा पाया रचला गेला तो बालवाडीतच. बालवाडीतच संस्कार मिळतात.

      आयुष्यातील पहिले पुस्तक भेट म्हणून मिळाले ते माझ्या पुरुषोत्तम मामाकडून.मामा हे अंतुर्लीला शिक्षक होते आणि ते रविवारी गावी येत असत.मामा शिक्षक असल्यामुळे त्यांनी माझ्याकडून बाराखडी,बालगीते, अक्षरे ओळखणे असे व्यवस्थितरित्या करुन घेतले.वाचनाचं महत्त्व लहानपणीच रुजवले गेले.पुस्तकांशी मैत्री लहानपणीच करता आली अन् ती आयुष्यात कामीही आली.मराठी शाळेत श्रीयुत हाजी गुरुजी तिसरीपर्यंत वर्गशिक्षक होते.हाजी गुरुजींनी अक्षरे वळविण्यास शिकविले.प्राथमिक शिक्षण हे जीवनाला कलाटणी देत होते.चारचौघांसारखा जगण्याचा आनंद लुटता आला.

माध्यमिक शाळा गावीच असल्याने तेथे दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले.पाचवीत श्रीयुत व्ही.डी. वाणी सर वर्गशिक्षक होते.सरांनी ABCD म्हणणे, अक्षरे ओळखणे आणि गिरवणे शिकविले.त्यांची सहजरित्या शिकवण्याची पद्धत मनाला खूप भावली.सोप्या पद्धतीने कसं विद्यार्थ्यांना समजेल यावर ते भर देत होते.गणित आणि सायन्स विषयाची खरी आवड निर्माण झाली ती सोनी सर, ए.बी. महाजन सर, एन.आर.पाटील सर यांच्यामुळेच.दैनंदिन जीवनाशी गणिताचा अन् विज्ञानाचा असलेला सबंध माध्यमिक वयातच लक्षात आला तो शिक्षकांच्या विविधांगी अध्यापन पद्धतींनीच.आयुष्यात उत्साही,आनंदी,निरोगी आणि शिस्तबध्द राहण्याचे खरे महत्व कळले ते एन.एन.पाटील सर, बी.एस.चौधरी सर यांच्या फिजीकल ट्रेनिंग (कवायत), स्पोर्ट ॲक्टीव्हीटीच्या उपक्रमातूनच.

  पाचवी ते दहावीपर्यंत अतिशय Healthy Competition होती.नेहमी पहिला किंवा दुसरा क्रमांक पटकवला.वकृत्व स्पर्धेच्या उपक्रमातून Stage daring आली.रवि महाजन,दगडू मालपूरे, जयंत महाजन,सचिन येवले सारखे वर्गमित्र लाभले.
मी,रवि व दगडू सहावी ते दहावी पर्यंत सहामाही आणि वार्षिक परिक्षेसाठी  टेरेस (गच्ची) वर अभ्यास करीत होतो.गृप स्टडीचं महत्त्व लहानपणीच कळाले.रोज सकाळी चार वाजता अभ्यासासाठी नियमित उठवणे व आम्ही जागे आहोत की झोपलो याची खात्री वेळोवेळी करुन घेणे हे माझ्या आई वडीलांनी अतिशय काळजीपूर्वक केले.यातून अभ्यासाचे महत्व त्यासाठी लागणारी जिद्द एकाग्रता व चिकाटी हे शिकायला मिळाले.दहावीत असतांना इंग्रजी विषयाचे आपल्या जीवनातील स्थान अतिशय सुंदररित्या श्री.पी.के.पाटील सरांनी समजावून सांगितले व ते easily अवगतही झाले.

अभ्यासासोबत खूप काही मैदानी खेळ खेळलो.क्रिकेट, विटी-दांडू,कबड्डी, गोटया,भवरे, डब्बा गुल,लपाछपी इ. सुट्टीमध्ये सर्व मित्र शेतात जावून बोर, जांभूळ,गहु हुरडा,हरबरा,मोसंबी खाण्याची मजा खूप वेगळी होती. लक्ष्मण भाऊ (आमचा सालदार) कडून बैलगाडी चालविणे,गाई म्हशीचे दुध काढणेही शिकलो.

   अकरावी सायन्सला दोघे गृप घेऊन धुळे येथे SSVPS ला ॲडमिशन घेतले.७५ टक्केच्या वरील मुलांची एक डिव्हीजन वेगळी करण्यात आली.या वर्गात सर्व इंग्लीश मिडियमची मुले होती.(Irrespective of percentage),सुरुवातीस खूपच त्रास झाला तो इंग्लिश अवगत करायला आणि सर्व व्याख्या (Defination) English मधून समजावून घ्यायला.यावेळेस माझ्या मोठया भावाने (डॉ. मनोज) माझे Moral-up केले आणि एक Science dictionary भेट दिली.ही dictionary मी अजूनही सांभाळून ठेवली आहे.प्रयत्नपूर्वक सारं समजून घेत होतो.पुढील सहा महिन्यात सर्व काही व्यवस्थित झाले.सर्व सर एक महत्वाकांक्षी विद्यार्थी म्हणून माझ्याकडे बघू लागले.यातून मी खूप काही शिकलो. 
Never give up, your perseverance will charge the perception of society
अकरावीसाठी पहिल्यांदा घराबाहेर पडलो होतो.होस्टेल जीवन,खानावळ,नवीन मित्र यातून खूप काही शिकायला मिळाले आणि सभोवतालच्या वातावरणानुसार स्वत:ला समजावून घेण्याची अतिशय उत्कृष्ट सवय लागली.

योगायोगाने इंजिनियरींगला धुळयातच नंबर लागला.दोघे बहीणी धुळयात असल्यामुळे त्याचा खूपच Moral Support मिळाला.उपकरणीकरण (Instrumentation) शाखेतून २००१ मध्ये distinction घेऊन उत्तीर्ण झालो.२००१ हे जागतिक मंदी (Recession) असलेले वर्ष,रिझल्ट लागल्यानंतर एक महिना घरी होतो.विचार केला की बाकी मित्रांसारखे आपणही  VLSI,C-DAC सारखा एखादा Software Course करावा.त्या basis वर पुढील Job शोधावा. पुण्याला मित्रांकडे गेलो.कोर्स चा तपास केला पण रु. 50,000/- खर्च होता.वडील व भाऊ दोघेही तयार होते खर्च करण्यास पण मन मानत नव्हते,की जे काही चार वर्ष शिकलो त्याचा काय फायदा.म्हणून घरी परत आलो. दोन दिवसांनी जॉब शोधण्यासाठी मुंबईला जाण्याचे ठरविले.वडिलांकडून 1100/- रुपये घेतले आणि निघालो. मनाशी पक्का निश्चय केला की आता आप्पांकडून (वडिलांकडून) पैसे नाही घ्यायचे तर आपण द्यायचे.बालपणाचे मित्र दगडू,किरण आणि विजय पाटील हे मला पाचोरा स्टेशनला सोडण्यासाठी आले.मित्र रवि हा मुंबईत Blue Star या कंपनीत Apprentice-ship करत होता व ITI होस्टेलला ठाण्यात राहत होता. मी रविकडे ITI होस्टेलला पोहचलो.रविसह त्याच्या सर्व रूममेटनी मला त्यांच्या रुममध्ये सामावून घेतले.त्यांच्या जेवणाबरेबर ते माझेही जेवण बनवत.त्यांनी माझ्यासाठी त्यांच्या Respective कंपनींमध्येही खूप प्रयत्न केला. अगदी एक महिना रविकडे राहिल्यानंतर मी श्री. जगदिश परदेशी (हरी काका परदेशी पाचोरा यांचा मुलगा) यांच्याकडे बॅचलर होस्टेलला रहायला गेलो. रोज सकाळी वर्तमान पत्रात Walk-in कॉल बघून मी तिकडे Interview ला जात असे. माझ्याजवळचे सर्व पैसे संपल्यानंतर मी जगदिशकडून पैसे घेण्यास सुरुवात केली. जगदिशनेही अगदी मोठया भावासारखा सपोर्ट केला. काहीतरी जॉब असावा म्हणून Oxford dictionary विकण्याचा जॉब मिळवला. पुढील पंधरा दिवसांत एक छोटया Services कंपनीमध्ये Trainee corrosion Engineer म्हणून नियुक्ती झाली. Instrument & Corrosion both are different field पण हातात जॉब असावा म्हणून Corrosion field चा जॉब स्विकारला. तोही एक वर्षाचे ॲग्रीमेंट आणि ओरिजीनल सर्टिफिकेट जमा करुन.हया जॉबमुळे बऱ्याच राज्यात मला फिरण्याची संधी मिळाली.पगार खूप कमी होता.वडील म्हणाले, "अरे इंजिनिअरींगला तुझा महिन्याचा खर्च तुझ्या पगाराएवढाच होता". मी त्यांना खूप Positively सांगितले, की आप्पा ही तर सुरुवात आहे.माझ्यासाठी हाती असलेलं काम छोटं किंवा मोठं नव्हतंच.फक्त स्वतःच्या हिमतीवर काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं.कंपनीचा ओनर हा गुजराथी होता.त्याच्या त्या Typical Attitude मधून खूप काही शिकायला मिळाले. Basically how to talk. Convince,deal financially, how to do the paperwork etc. 

     एका वर्षानंतर माझ्या लहान जिजाजींना ब्रेन हॅमरेज झाला.  (One of the bad and worst incidence of my life) आणि ते मुंबईत जसलोक हॉस्पिटल मध्ये होते.त्यावेळेस मी माझा जॉब सोडला.पुढील दोन महिन्यांनंतर मला दमण येथे M/s Bloom Packaging Pvt. Ltd. मध्ये Instrumentation Engineer म्हणून जॉब मिळाला.एक वर्ष दमणला काढल्यानंतर मी मुंबईत M/s. Lab india Pvt.Ltd.मध्ये Business Development Manager म्हणून रुजू झालो.Business Development रोलमध्ये नेहमी इतर कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटशी संपर्क येऊ लागला व त्यामधून जीवनात एक वेगळीच कलाटणी मिळाली.How to sell whatever we have, be positive, be optimistic. How to convince, drive for results etc. पुढे Labindia National BDM सोबत Middle East area ही मिळाला.बरेचसे परदेश दौरे ही झाले.

   2007 मध्ये माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी decision घेण्याची वेळ आली आणि सौ.सानिका ही माझी आयुष्यात माझी सहचारणी म्हणून आली.लग्नानंतर दोन महिन्यात मला M/s Emerson Automation Solution मधून खूपच चांगला जॉब ऑफर केला गेला आणि तो मी स्विकारला.
2009 हा आमच्या आयुष्यात एका चिमुकल्याने जन्म घेतला. अर्णव आल्यामुळे आणि डोंबिवलीत आमच्यासोबत कुणीही नसल्यामुळे,सानिकाने तिच्या Computer Teacher चा जॉब सोडला व पुढील काही वर्ष House Wife म्हणून घालविण्याचे आनंदाने स्विकारले. M/s Emerson कडून नॉमिनेशन बेसीस वर MBA (Marketing) साठी Selection झाले आणि 2012 मध्ये New Southern Hampshire University of USA मधून MBA In Marketing ची degree मिळविली. MBA करत असतांना मला full day weekend classes असायचे व दुसरा चिमुकला अद्वय पण 3-4 महिन्यांचा होता.तरीही सानिका मला Weekend साठी नेहमी encourage करत असे. अचानक Pneumonia मुळे अद्वयला आम्ही तो सहा महिन्यांचा असतांना गमावले. (another Bad & Worst incidence of Life) मी सानिका आणि अर्णव आम्ही यातून सावरलो ते अद्वय अस्मिच्या रुपात आमच्या आयुष्यात आल्यानेच.

सावरावं लागतंच.दुःखाचा डोंगरही थोडा बाजूला सारावा लागतो यश मिळवतांना.खरंतर जीवन हे आनंदानेच जगलो.सुखदुःख सोबत होतेच.हाती आलेलं काम प्रामाणिकपणे करत गेलो.कामात सातत्य ठेवत होतो.मनाचा निश्चय सतत जागा ठेवत असतो.

    मी सदैव माझे आई,वडील,भाऊ बहीण,शिक्षक आणि मित्र परिवार यांचा ऋणी राहीन.या सर्वांनी मला नेहमीच प्रोत्साहीत केले आणि always stand behind me during my up & downs.
Special thanks to my wife as always motivating me to move ahead  & being together as back bone of my life during all stages  as a back bone of my life.

This whole journey taught me to belief in yourself, never get frustrated, do the right things at right place, success will be there.

“Nothing can stop the man with the right mental attitude from achieving his goal.
धन्यवाद.

👉🏻
Nilesh Eknath Malpure
At-post- Lohtar Tal- Pachora Dist- Jalgaon
M/S Emerson Automation solutions
Senior Business Development Manager,
Powai, 
Mumbai—400 076.

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻

No comments:

Post a Comment